आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Conflicts Between Cm & Homeminister For The Selection Of Mumbai Cp

मुख्यमंत्र्यांमुळेच मुंबई पोलिस आयुक्तांची नियुक्ती रखडली- राष्ट्रवादी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईसारख्या संवेदनशील शहरासाठी पोलिस आयुक्त नेमण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेच जबाबदार असून, त्यांनी लवकरात लवकर नियुक्तीचा निर्णय घ्यावा, अशी भूमिका राष्ट्रवादीने आज सहाव्या दिवशी घेतली आहे. गेली सहा दिवस मुंबई पोलिस आयुक्तविना आहे. तसेच गृहमंत्री आर आर पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यातील वर्चस्ववादामुळेच ही निवड रखडली असल्याची चर्चा आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री आर आर पाटील यांनीही गुडघे टेकले असून, तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा असे सांगत यातून अंग काढून घेतले आहे.
त्यामुळेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबईत बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री चव्हाण यांच्यामुळेच मुंबई पोलिस आयुक्ताची नियुक्ती रखडली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करतो की, त्यांनी मुंबईसारख्या संवेदनशील शहराला लवकरात लवकर पोलिस आयुक्त द्यावा. दरम्यान, विरोधी पक्षांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील भांडणांचे वाभाडे काढले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत टि्वटरवरून आपली जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील आयपीएस आणि वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या बदल्यावरून गेल्या नऊ महिन्यापासून गृहमंत्री आरआर व मुख्यमंत्री चव्हाण यांच्यात शीतयुद्ध सुरु आहे. मुख्यमंत्री आपल्या अधिकाराखाली आयपीएस अधिका-यांच्या बदल्या करीत असल्याने व गृहमंत्र्यांना विचारत घेत नसल्याने चव्हाण यांच्या कार्यशैलीवर आबा नाराज आहेत. यापूर्वीही आबांनी जाहीर सभांत व कॅबिनेटमध्ये याबाबत वक्तव्ये केली आहेत. मला जर पोलिस अधिका-यांच्या बदल्याची माहितीच होणार नसेल तर हे खाते संभाळण्यात आपल्याला स्वारस्य नाही असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना ठणकावले आहे. आताही सत्यपाल सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त कोण असावा यावरून वाद सुरु आहे.
पुढे वाचा, मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीपुढे झुकण्यास नकार...