आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Conflicts Between Manohar Joshi & Shivsainik\'s At Dasera Melava

मनोहर जोशींच्‍या घराभोवती सुरक्षाकडे; अप्रत्यक्ष टीका भोवली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेना आणि मनोहर जोशी हे एकमेंकापासून दूर जाताहेत, याचे स्पष्ट संकेत रविवारच्या दसरा मेळाव्यात दिसून आले. जोशी यांनी नुकतेच एका मुलाखतीत 'बाळासाहेबांच्या तुलनेत कुमकुवत नेतृत्त्व' अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांत वादाच्या भोवर्‍यात सापडलेले माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना सेनेच्या दसरा मेळाव्याचे व्यासपीठ अवघ्या तीन मिनिटांत सोडून जावे लागले. विशेष म्हणजे शिवसैनिक जोशी यांच्यासोबत काही दगाफटका करतील या भीतीने खबरदारी म्हणून कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात त्यांना शिवतीर्थावरून बाहेर नेण्यात आले. आता जोशी यांच्या घराबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था पुरविली गेली आहे.
मनोहर जोशी यांनी दादर येथे एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यावरून शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजीचे वातावरण होते. जोशी यांनी शनिवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या वक्तव्याविषयी चर्चा केली होती व या चर्चेनंतर सर्व काही आलबेल व शांत असल्याचा निर्वाळाही दिला होता. या वादावर त्यामुळे पडदा पडला असेच चित्र होते. मात्र, तसे घडताना दिसले नाही. जोशी हे दसरा मेळाव्यास काहीसे उशिराच व्यासपीठावर दाखल झाले. त्यांचे आगमन होताच शिवतीर्थावर ‘चले जाव’च्या घोषणा सुरू झाल्या. यात शिवसेनेच्या रणरागिणींचाही समावेश होता. ही घोषणाबाजी इतकी वाढली की, चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष अभिनेते शरद पोंक्षे यांना आपले भाषण आवरते घ्यावे लागले. घोषणा देणार्‍या शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन व्यासपीठावरून केले जात होते. स्वत: उद्धव, आदित्य व रश्मी ठाकरे यांनीही शिवसैनिकांना संयम राखण्याचे आवाहन केले. ही घोषणाबाजी सुरू असतानाच मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मेळावा सोडून जाण्याची परवानगी मागितली. गर्दीचा रेट्या पाहता उद्धव ठाकरे यांनीही जोशी यांना व्यासपीठ सोडून जाण्याची परवानगी दिली आणि तीन मिनिटातच जोशींना व्यासपीठावरून घरी जावे लागले.
आणखी पुढे वाचा,