आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Conflicts Between Sunil Tatkare & Bhaskar Jadhav Once Again Come Out

\"राष्ट्रवादी\"त रणसंग्राम; सुनील तटकरे आणि भास्करराव जाधव यांच्यात पुन्हा पेटला संघर्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे पार पडलेल्या गडनदी धरणाच्या जलपूजनाच्या कार्यक्रमावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन दिग्गज नेत्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला आहे. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेतेच असे वागू लागले तर काय करायचे असा प्रश्न पक्षनेतृत्त्वासमोर उभा राहिला आहे. यामुळे वैतागलेल्या पक्षाध्यक्ष शरद पवार या दोघांची कानउघाडणी करण्यासाठी लवकरच एक बैठक घेण्याचे निश्चित केले आहे.
तटकरे आणि भास्कर जाधव यांच्यातील 36 चा आकडा सर्वश्रुत आहे. सुनील तटकरे हे अजित पवारांच्या जवळचे मानले जातात. तर, त्यामुळे अडगळीत पडलेल्या भास्कररावांना प्रदेशाध्यक्ष करून थोरल्या पवारांनी त्यांना पुढे आणले आहे. मात्र, हे दोन कोकणातील दिग्गज मी मोठा तू मोठा यासारखा हूतूतूचा खेळ खेळत आहेत. आताचा वाद असाच पोरखळ कारणावरून रंगला आहे.
जलसंपदाच्या विभागाने जलपूजनाच्या कार्यक्रमाच्या जाहिरातीत आपण गुहागरचे आमदार असूनही आपले नाव मुद्दाम टाकले गेले नाही असा आरोप प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यांवर केला आहे. तसेच कोकणात पक्षवाढीसाठी तटकरे यांनी कोणताही प्रयत्न केला नाही. तटकरेंनी केवळ आपल्या घरातच पक्ष वाढवला असा थेट हल्लाबोल जाधव यांनी चढवला.
आणखी पुढे वाचा.........