आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Conflicts In Bjp & Sena Over An Issue Of Raj gadkari Political Meeting

गडकरींच्या \'राज\'नितीमुळे सेना नाराज; भाजपात कम्युनिकेशन गॅप- उद्धव ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेना-भाजप-रिपाइंसह इतर सर्वच घटकपक्ष एकत्र आले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार जर कोणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या करील तर त्याला जनता माफ करणार नाही. भाजपमधून कोणी सत्ताधारी नेत्यांवर स्तुतिसुमने उधळत असेल तर त्याला भाजपमधील कम्युनिकेशन गॅप कारणीभूत असल्याचे परखड व सडेतोड मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींचे नाव न घेता व्यक्त केले.
नितीन गडकरी यांनी काल दुपारी राज ठाकरे यांच्या भेटीबाबतही नितीन गडकरी यांच्यावर शरसंधान करण्याची संधी सेनेने सोडली नाही. महायुतीची बस फुल झालेली आहे आणि ते सुसाट वेगाने सुटलेलीसुद्धा आहे. अशा परिस्थितीत जर कोणी या बसमध्ये येण्याचा प्रयत्न केला तर अपघातच होईल. महायुतीत आता कोणालाही येता येणार नाही. नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांना दिलेली ऑफर ही एनडीएची नसून ती, व्यक्तिगत ऑफर आहे. शिवसेना एनडीएत आहे आणि याबाबत सेनेला विचारून ती ऑफर दिलेली नाही, असे सांगत शिवसेनेने गडकरींच्या 'राज'नितीवर टीकास्त्र सोडले आहे.
मुंबईतील एका कार्यक्रमानिमित्ताने उद्धव ठाकरे बोलत होते. एकीकडे महायुती कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करण्याचे आवाहन जनतेला करीत असताना दुसरीकडे भाजप नेते नितीन गडकरी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर स्तुतिसुमने उधळत असल्याबाबत पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, की तो भाजपचा अंतर्गत प्रश्‍न असून महायुती काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार उखडून काढण्यासाठी कटिबद्ध आहे. आमची धोरणे स्पष्ट आणि रोखठोक आहेत.
अजित पवारांना अक्कल नाही म्हणूनच अकलेचे तारे तोडताहेत!- अजित पवार यांनी महायुतीला बुजगावणे म्हणून संबोधले असले तरी बुजगावणे हेच खरे शेतकर्‍याचे मित्र आहे. अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराने पोखरलेल्या धरणांपेक्षा हे शेतातील बुजगावणेच शेतकर्‍याला अधिक प्रिय असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. अजित पवार यांच्याकडे मुद्देच उरलेले नाहीत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे जहाज हे बुडणार असे मीच आधी म्हणालो होतो. आता तेच वाक्य अजित पवार भाषणात वापरत आहेत. आधी आमच्याकडची माणसे चोरली, आता मुद्दे चोरताहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांचा समाचार घेतला.