आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीने भुजबळ, आर.आर.पाटीलांना समन्वय समितीतून गाळले, ४ ऑगस्टला बैठक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक येत्या चार तारखेला मुंबईत होणार आहे. सुमारे दीड वर्षानंतर प्रथमच दोन पक्षातील नेत्यांची समन्वय समितीत एकत्रित चर्चा होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून आघाडीतील दोन्ही पक्षात धुसपूस सुरु होती. अनेक महिन्यांपासून राज्यातील समन्वय समितीची बैठक झाली नाही, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तक्रार होती. त्यानंतर दोन्ही पक्षांनी नवी समन्वय समिती बनवून बैठकीचे आयोजन केले आहे.
काँग्रेसच्या समन्वय समितीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व केंद्रातील आणखी एक नेता अशी ही समिती असणार आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितीत पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांचा समावेश असणार आहे. मात्र या समितीतत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांना समन्वय समितीत स्थान देण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मदन बाफना यांना विचारले असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.
आघाडीत बिघाडी - राष्ट्रवादीचे बंड; काँग्रेस अस्वस्थ
सरकार चालवताना समन्वय आवश्यक; शरद पवार यांचे प्रतिपादन
लोकाभिमुख प्रशासनासाठी समन्वय साधा : खासदार खैरे