आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमधील चिकलफेकीने आव्हाडांना आनंदाच भरतं, होर्डिंग लावून पुरोहितांचे अभिनंदन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपचे जुनेजानते व पाच वेळा आमदार राहिलेले नेते राज पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सध्याच्या सरकराच्या धोरणावर तोंडसुख घेतल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना उकळ्या फुटल्या आहेत.
भाजपातील नेत्यांवर चिखलफेक केल्याने आव्हाडांनी पुरोहित यांच्या अभिनंदनाची होर्डिंग लावली आहेत. 'आम्ही जे बोलू शकलो नाही, ते तुम्ही बोलून दाखवले. मर्द राज पुरोहितांचे मन:पूर्वक अभिनंदन. राज पुरोहित तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा आशयाचे होर्डिंग आमदार आव्हाड यांनी त्यांच्या ठाणे परिसरात लावली आहेत.
बातम्या आणखी आहेत...