आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Aggresive Over Giriraj Singh Statement Of Sonia Gandhi

गिरीराज यांच्या वक्तव्याविरोधात मुंबईत निदर्शने, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल वर्णद्वेषी टिप्पणी करणार्‍या केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या विरोधात देशभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईतही याचे जोरदार पडसाद उमटले. मुंबई काँग्रेसनेही गिरीराज सिंह यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत निदर्शने केली. यावेळी गिरीराज यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या एकदिवसीय दौर्‍यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी 'नरेंद मोदी हाय हाय', 'सोनिया गांधी जिंदाबाद'चे नारे दिले. गिरीराज सिंहांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी केली. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर जाऊ नये साठी मुंबई पोलिसांनी संजय निरुपम यांच्यासह सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येत आहेत. त्यावेळी त्यांना गिरीराज यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, नवी दिल्लीत गिरीराज सिंह यांच्या घराबाहेर यांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले आहे.
देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन गिरीराज सिंहांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे गिरीराज सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी गिरीराज सिंह यांना फटकारले आहे.
गिरीराज सिंह यांनी बिहारमधील हाजीपूरमध्ये सोनिया गांधींसह राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. राजीव गांधी यांनी एखाद्या नायजेरियन महिलेशी लग्न केले असते, गोरी कातडी नसती तर काँग्रेस पक्षाने त्यांचे (सोनिया) नेतृत्व स्वीकारले असते का? अशी मुक्ताफळे उधळली होती.