आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Aggressive On Land Acquisition Act In Maharashtra

राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेस हक्कभंग आणणार, भूसंपादन कायदा लागू करण्यास विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - संसदेची मान्यता मिळण्यापूर्वीच राज्यात नव्या भूसंपादन कायद्यातील आक्षेपार्ह अटी लागू करण्याला काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून राज्य सरकारविरूद्ध हक्कभंग आणण्याचा निर्णयही घेतला आहे.
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना एखाद्या कायद्यातील महत्वाच्या तरतूदी विधिमंडळाला अंधारात ठेवून बदलणे, हा सभागृहाचा हक्कभंग असल्याची टीका विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

राज्यात भूसंपादन कायदा लागू करण्यात आल्याचे वृत्त "दिव्य मराठी'ने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत आता याविरुद्ध सरकारची कोंडी करण्याचे काँग्रेसने ठरविले आहे. “ राज्य सरकारने राज्यात लागू केलेल्या कायद्यात शेतकऱ्यांची संमती भूसंपादनासाठी आवश्यक होती. मात्र ही अट वगळण्याचा राज्य सरकारला निर्णय करायचा असेल तर त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचे होते. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना यासाठी दुरुस्ती विधेयक राज्य सरकारने सादर करायला हवे होते.तसे न करता अधिसूचना काढणे हा सभागृहाचा हक्कभंग असून याविरुद्ध काँग्रेस सोमवारी हक्कभंग ठराव सादर करून सरकारला धारेवर धरेल,'' असेही माजी राज्यमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

उद्योगपतींसाठीच सरकारची घिसाडघाई : कायद्यात दुरुस्ती वा कायद्यातील एखादी अट लागू न करण्याचा निर्णय हा अधिसूचनेने करण्याचा प्रकार चुकीचा आहे. यासाठी कायद्यात दुरुस्तीचाच पर्याय अवलंबायला हवी होती. अधिसूचना ही दिशाभूल आणि चुकीची पद्धत आहे, अशी टीका त्यांनी केली.

संसदेची मान्यता न मिळाल्या केलाने केंद्रातील सरकारने भूसंपादन अध्यादेश नव्याने लागू केला आहे. पुढील सहा महिन्यांच्या काळात सर्व खास उद्योगपतींना जमीनी देऊन राज्य आणि केंद्रातील सरकार मोकळे होईल. त्यासाठीच दोन्ही सरकार घिसाडघाई करीत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.