आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congress And Nationalist Congress Party Will Close Relation With Others Party Before Loksabha Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस- राष्‍ट्रवादीच्या इतर आघाड्या संपुष्टात, 22-26 फॉर्म्युलावर ठाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी इतर पक्षांसोबतच्या (शिवसेना- भाजप) आघाड्या संपुष्टात आणण्याच्या मुद्द्यावर काँग्रेससोबत झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत एकमत झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी केला. तसेच, जागावाटपाच्या 22-26 फॉर्म्युलावर पक्ष ठाम असल्याचेही ते म्हणाले.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 22 जागांसाठी उमेदवार रिंगणात उतरवण्याचा राष्ट्रवादीचा मानस आहे. याबाबतचा निर्णय पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला असल्याबाबतही राष्ट्रवादीतर्फे वारंवार सांगण्यात येत आहे. परंतु, काँग्रेस मात्र असा कुठलाही फॉर्म्युला निश्चित झाला नसल्याचे सांगत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आपण 22 जागा लढवण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे पुन्हा सांगितले आहे.

आता जागावाटपाबाबतचा निकष ताकद नव्हे, तर आघाडी टिकवणे हाच आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीत राष्ट्रवादी कॉँग्रेस हा अतिशय जवळचा मित्र असल्याचे केंद्रातील काँग्रेस नेते सांगतात. त्यामुळे त्यांचे इतर नेते काय बोलतात, हा त्यांचा प्रश्न आहे. जागावाटपाबाबत काँग्रेसचे निर्णय दिल्लीत होतात. येथील काँग्रेस नेत्यांना तसे अधिकार नाहीत. शेवटी मोठा भाऊ छोट्याची काळजी घेतच असतो. सध्या मात्र केवळ जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणता येतील यावरच चर्चा होत आहे, असे मलिक यांनी सांगितले.