आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress And Ncp Issue News In Marathi, Maharashtra Election

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून युतीत सबुरी, आघाडीत कुरबुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विधानसभा निवडणुकीचे पडघम आता सुरू झाले आहेत. एकीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीदरम्यान जागावाटपावरून सतत ‘तू तू-मैं मैं...’ सुरू असताना महायुतीच्या गोटात मात्र जागावाटपाचे व्यवहार अजून तरी गोडीगुलाबीने सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच शिवसेना-भाजप युती रिपाइं, रासप, स्वाभिमानी या मित्रपक्षांना सोबत घेऊन विधानसभा निवडणुकांना सामोरे जाईल. या महायुतीचे जागावाटप 28 जुलै रोजी होणार आहे. शुक्रवारी मुंबईत झालेल्या सेना-भाजप नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

काँग्रेस व राष्ट्रवादीचे जागांचे भांडण दिल्ली दरबारी पोहोचले असले तरी तिथेही काँग्रेस श्रेष्ठी राष्ट्रवादीला आणखी मोकळे रान देण्याच्या विचारात नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीत समन्वयाची भूमिका दिसत आहे. बांद्रा-कुर्ला संकुलामधील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या बैठकीस भाजपकडून एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे तर शिवसेनेकडून संजय राऊत, सुभाष देसाई, दिवाकर रावते, गजानन किर्तीकर आणि लिलाधर डाके यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे भांडण पक्षश्रेष्ठींकडे
भाजपला आणखी हवे, पण... गेल्या विधानसभेत शिवसेनेने 169 पैकी 45, भाजपने 119 पैकी 46 जागा जिंकल्या. लोकसभेतील कामगिरीमुळे भाजप वाढीव जागा मागत आहे. भाजपला या निवडणुकीत 15 जागा अधिक हव्या आहेत. मात्र उद्धव ठाकरे नव्हते. त्यामुळे हा विषय निघालाच नाही. सोमवारी होणाºया बैठकीत कदाचित हा विषय निघू शकतो.

रणनीतीवर चर्चा
या बैठकीत रणनीतीवर प्राथमिक चर्चा झाली. छोट्या पक्षांना योग्य वाटा देण्यावर एकमत झाल्याचे भाजप देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितले. बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते.

मित्रपक्षांना वाटा
बैठकीत राज्यातील 288 जागांचा आढावा घेण्यात आला. सेना-भाजप विधानसभेसाठी एकत्र असतीलच, शिवाय घटक पक्षांना जागावाटपात योग्य वाटा देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, पवार आज देणार कानमंत्र