आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress And NCP Meeting News In Marathi, Mumbai

पॉवरबाज फॉर्म्युला: आमचे खासदार जास्त; आता जागाही जास्त द्या!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेसने 2004 व 2009 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात अधिक जागा मिळाल्याचा निकष लावून विधानसभा निवडणुकांसाठी जास्त जागांवर दावा सांगितला आणि त्या पदरात पाडून घेतल्या. मात्र आता काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे खासदार जास्त निवडून आल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचे सूत्र नव्याने ठरवायला हवे, असा दबाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसवर आणला आहे. लोकसभेत काँग्रेसचे दोन, तर राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले आहेत. यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीची चिंतन बैठक पार पडली. त्यात पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या अपयशाचे खापर काँग्रेसवर फोडताना विधानसभेत जास्त जागांची मागणी केली. विधानसभेच्या 288 जागांसाठी गतवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीत अनुक्रमे 174 व 114 असा फॉर्म्युला होता.

विधानसभा तयारीसाठी 18 तास काम करणार
काँग्रेस व मित्रपक्षांवर लोक नाराज असल्याचे दिसून आले आहे. विधानसभेला चारच महिने उरले आहेत. पराभवाने खचून न जाता मार्ग काढण्याचा मी माझ्या परीने निर्णय घेतला आहे. रोज 18 तास काम करणार आहे, असे पवारांनी सांगितले.

मराठा, मुस्लिम आरक्षण, एलबीटीचे निर्णय घ्या
एलबीटीच्या निर्णयाचा घोळ घातल्याने व्यापारी नाराज आहेत. मराठा, मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयातही आता चालढकल होऊ नये. उशीर लावला तर काय होते, हे दिसले. झटपट निर्णय घेतले नाही, तर विधानसभेत खरे नाही, असा टोला पवारांनी लगावला.

लोकांचा विश्वास कमावता आला नाही
महिला, व्यावसायिक, सरकारी कर्मचारी यांचाही विश्वास संपादन करण्यात आम्ही आघाडी सरकार म्हणून अपयशी ठरलो. राज्यातील विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना, या सर्व बाबींचा विचार करायला हवा, अशी सूचना पवार यांनी केली.

काँग्रेससोबत नसल्याचा जया व ममतांना लाभ
देशातील काँग्रेसविरोधी वातावरणाचा फटका यूपीएच्या घटक पक्षांना बसला. आंध्र, ओडिशातही काँग्रेससोबत नसणार्‍या पक्षांना यश मिळाले. काँग्रेस, भाजपला दूर ठेवण्याचा फायदा जयललिता, ममता, पटनायक तसेच आंध्रतील पक्षांना झाला.

काँग्रेसला योजना सांगता आल्या नाही
अन्न सुरक्षा योजना, राजीव गांधी जीवनदायी योजना, नरेगा, माहितीचा अधिकार, महिलांना 50 टक्के आरक्षण अशा योजना यूपीए आघाडीतील प्रमुख पक्ष म्हणून काँग्रेसला लोकांपर्यंत नेता आल्या नाहीत.