आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress And NCP State Assembly Election Seat Issue, Maharashtra, Divyamarathi

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा शनिवारी ठरणार; 23 फेब्रुवारीला आघाडीची पहिली सभा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपाची अंतिम यादी 15 फेब्रुवारीपर्यंत जाहीर होईल. मुंबईत 23 फेब्रुवारीला होणार्‍या आघाडीच्या पहिल्या सभेपासून प्रचाराला सुरुवात होईल. यात दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित असतील. प्रचारासाठी संयुक्त समितीची स्थापना केली जाईल. राष्ट्रवादीने कोल्हापूर, तर दुसरीकडे, काँग्रेसनेही कोल्हापूर व हिंगोली जागेचा आग्रह सोडलेला नाही.

पवार विश्वासघातकी-थॉमस : केंद्रीय अन्नमंत्री के.व्ही. थॉमस यांनी कृषिमंत्री शरद पवार हे ‘पाठीत खंजीर खुपसणारे’ असल्याची टीका केली आहे. सोनिया यांच्या विदेशी वंशाच्या मुद्दय़ावरून पवार यांनी 1999 वर्षात काँग्रेसमध्ये बंड केले होते. थॉमस यांनी आपल्या ‘सोनिया : बिलोव्हड् ऑफ मासेस’ पुस्तकात पवारांवर प्रकरणच लिहिले आहे.