आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress And NCP To Settle On 26:22 Seat Sharing Formula

आघाडीवर पुन्हा शिक्कामोर्तब! लोकसभेसाठी 26:22 चा फॉर्म्युला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल या दोघांमध्ये चर्चा झाली. या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवर पुन्हा शिक्कामोर्तब झाले. या निवडणुकीत काँग्रेस 26 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 22 जागा लढवणार असल्याचा पुनरुच्चारही या वेळी करण्यात आला.
प्रफुल पटेल व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. गेल्या निवडणुकीमध्ये ठरलेला 26 : 22 चाच फॉर्म्युला या वेळीही निश्चित करण्यात आला. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस 22 जागांवर निवडणूक लढणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे मंगळवारी अधिकृतरीत्या दोन्ही पक्षांमध्ये त्यावर चर्चा झाली.

पत्रकारांशी बोलताना पटेल यांनी गतवेळप्रमाणेच 26:22 चा फॉर्म्युला निश्चित केल्याचे सांगितले. गेल्यावेळी राष्ट्रवादीपेक्षा चांगले यश मिळाल्याने यंदा काँग्रेस अधिक जागा मागणार असल्याची चर्चा होती. मात्र मुख्यमंत्री व पटेल यांच्या चर्चेनंतर त्याला पूर्णविराम मिळाला आहे.