आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Campaign For Review Of Drought In Maharashtra

दुष्काळाच्या समीक्षेसाठी काँग्रेसने घेतला पुढाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील दुष्काळाची समीक्षा करण्यासाठी तसेच दुष्काळग्रस्तांच्या समस्या सरकारकडे मांडून त्यांना मदत मिळवून देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागीय बैठका आणि जिल्हानिहाय दौऱ्यांचा कार्यक्रम सुरू केला आहे. मराठवाडा विभागाची बैठक येत्या जानेवारीला, तर विदर्भ विभागाची बैठक येत्या १२ जानेवारी रोजी अमरावती येथे होणार आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात नापिकी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी वर्ग अत्यंत अडचणीत सापडला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी दुष्काळी उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या हेतूने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागीय समित्या स्थापन केल्या आहेत, असे ते म्हणाले. या सर्व समित्या जिल्ह्यांमध्ये गावपातळीवर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा शेतीची पाहणी करतील. समित्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे शिष्टमंडळ संपूर्ण राज्यातील परिस्थितीचा संयुक्त अहवाल सरकारला सादर करेल दुष्काळग्रस्तांना मदत देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.

मराठवाडा समिती : मराठवाडा विभागाच्या पाहणी समितीत माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, आमदार वसंतराव चव्हाण, आ. संतोष टारफे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, लातूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष त्र्यंबकदास झंवर, उस्मानाबाद जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विश्वासराव शिंदे, माजी आमदार सुरेश नवले यांचा समावेश आहे.

औरंगाबाद अशोक चव्हाणांकडे : औरंगाबादमहानगरपालिका निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, पालघर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, तर ठाणे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि हर्षवर्धन पाटील यांची िनरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्र समिती : उत्तरमहाराष्ट्राच्या पाहणी समितीमध्ये माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आ. चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार जयंत ससाणे, माजी आमदार शिरीष कोतवाल, धुळे जि.प.चे सभापती मधुकरराव गर्दे यांचा समावेश आहे.

रोष व्यक्त करा :दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची थेट भरीव मदत देण्यात भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील राज्यातील सरकार अपयशी ठरले असून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. हा रोष सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ०४०७१०१२२०० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.

प्रेरणा यात्रा :दक्षिण अाफ्रिकेतील कृष्णवर्णीय नागरिकांच्या अधिकारांसाठी यशस्वी लढ्यानंतर महात्मा गांधींच्या मायदेशी आगमनाची शताब्दी साजरी करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे.