आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Comment On Shiv Sena Chief Uddhav Thackeray

BJPवर टीका न करता सत्ता सोडून दाखवा, ठाकरेंना काँग्रेसचे आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘एकीकडे सरकारच्या धोरणांवर टीका करायची आणि दुसरीकडे सत्तेचा उपभोग घ्यायचा, असा दुटप्पीपणा शिवसेनेने चालवला आहे. त्यापेक्षा हिंमत असेल तर शिवसेनेने थेट सत्तेतून बाहेर पडून दाखवावे,’ असे अाव्हान काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिले अाहे.

सत्तेसाठी लाचारी पत्करणाऱ्या शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊ नये. सरकारला नालायक म्हणून शिवसेनेचे पापक्षालन होत नाही. सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे जनतेला होणाऱ्या त्रासासाठी भाजपपेक्षा शिवसेनाच अधिक जबाबदार आहे, अशीही टीका त्यांनी केली.

सत्तेत राहून कायम भाजपवर ताेंडसुख घेणाऱ्या उद्धव ठाकरेंप्रमाणेच सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही चांगलाच समाचार घेतला. ‘राज्यातील सावकारांनी परवाना क्षेत्राबाहेर दिलेली कर्जे राज्य सरकार मंजूर करण्याच्या तयारीत आहे. हा सर्व प्रकार सावकारांना पाठीशी घालण्यासाठी असून हे सरकार शेतकऱ्यांचे नव्हे तर सावकारांचेच अाहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सावकारी कर्जाच्या पाशातून मुक्त करण्याची घोषणा केली होती. मात्र, मागील दीड वर्षाच्या कालावधीत जेमतेम ३० हजार शेतकऱ्यांचीच कर्जफेड करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ टिप्पणीनुसार सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेर शेतकऱ्यांना दिलेली कर्जे माफ करण्याचे प्रस्तावित आहे. अशी कर्जे अवैध व नियमबाह्य आहेत. सावकारी कायद्याचे उल्लंघन करून शेतकऱ्यांना कर्जे दिलेली असल्यास या सावकारांविरुद्ध कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. शिवाय शेतकऱ्यांना दिलेली कर्जे नियमबाह्य असल्याने सरकारने ती माफ करण्यासाठी सावकारांना जनतेच्या तिजोरीतून पैसा देण्याची गरज नाही. सावकारांविरुद्ध फौजदारी कारवाई करून ही कर्जे बेकायदा ठरवली पाहिजेत. शेतकऱ्यांनी सावकारांना कर्जाची परतफेड करणे आवश्यक नसल्याचे जाहीर करून शेतकऱ्यांचे तारण परत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

अकार्यक्षम मंत्री असल्याची कबुली
राज्यातील जनता दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. दुष्काळापेक्षा सरकारला मंत्रिमंडळ विस्तार महत्त्वाचा वाटताेय. फडणवीस यांनी अकार्यक्षम मंत्र्यांना २०१७ मध्ये डच्चू देणार असल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ मंत्रिमंडळात अकार्यक्षम मंत्री असल्याचे त्यांनी मान्य केले असून त्यांना डच्चू देण्यासाठी २०१७ चा मुहूर्त कशाला हवा, असा प्रश्नही सचिन सावंत यांनी विचारला अाहे.