आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Declared Its Vision Document, Divya Marathi

जाहीरनामा: कॉंग्रेस देणार नववी पास विद्यार्थ्यांना टॅब, सह्याद्रीमधील पाणी मराठवाड्यात आणू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दुष्काळप्रवण जिल्ह्यांसाठी कायमस्वरुपी निधीची तरतूद, शेतक-यांना दिवसाला १८ तास वीज, मिनी ट्रॅक्टरसाठी अनुदान, स्वतंत्र कृषी दर्शन वाहिनी तसेच सह्याद्रीमधील पावसाचे पाणी मराठवाड्यात वळवण्याचे आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट देण्याचे आश्वासनही या वेळी दिले.

गुरुवारी गांधी भवनमध्ये जाहिरनाम्याचे प्रकाशन झाले. पाणी प्रदूषण रोखण्यासाठी कठोर कायदा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात औद्योगीक प्रकल्पांचा विस्तार, भिवंडी, मालेगाव, सोलापूर येथे टेक्सटाईल पार्क आणि नोकरी मिळेपर्यंत युवक-युवतींना दोन हजार भत्ता देण्यात येईल, असे आश्वासनही जाहीरनाम्यात आहे.जातीय अत्याचारासंदर्भातील खटल्यांसाठी द्रुतगती न्यायालये, पोलिसात मुस्लिमांना प्राधान्य याचाही समावेश यात केला आहे.

अंमलबजावणी अशक्य
जाहीरनाम्यातील सर्व तरतुदींची कोणत्याच पक्षाकडून पूर्णपणे अंमलबजावणी होत नाही. काँग्रेस पक्षही त्यास अपवाद नाही. काही प्रश्न प्रलंबित राहतातच.
सुशीलकुमार शिंदे, जाहीरनामा प्रमुख