आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या हत्येची चौकशी करा; काँग्रेस प्रवक्त्यांची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेली ४९ वर्ष दीनदयाळ उपाध्याय यांच्या हत्येचे गूढ उलगडले नसल्याने, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षी तरी राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपाध्याय यांच्या हत्येची चौकशी करण्याची विनंती करावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरुवारी केली.

सावंत म्हणाले की, उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करीत आहे. देशभरात अनेक राज्यांमध्ये उपाध्याय यांच्या नावाने रेल्वे स्टेशनचे नामकरण करणे तथा त्यांचे पुतळे उभारण्याचे कार्यक्रम ठिकठिकाणच्या भाजप सरकारांनी हाती घेतले आहेत. विधिमंडळात त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर चर्चा होत आहे. अशा व्यक्तिमत्त्वाच्या हत्येचे गूढ अजूनही उलगडलेले नसणे हे दुर्देवाचे आहे. गेल्या तीन वर्षापासून केंद्रात भाजपचे सरकार आहे. या तीन वर्षात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अपघाती मृत्यूची चर्चा आणि चौकशी करण्यात या सरकारने रस दाखवला. परंतु अपेक्षा होती की, संघ आणि भाजपासाठी महत्त्वाचे असणाऱ्या उपाध्याय यांच्या हत्येची चौकशी देखील होईल. परंतु दुर्देवाने वाजपेयी सरकारच्या ६ वर्षाच्या कालखंडाप्रमाणे मोदी सरकारने त्यासंबंधी कोणतेही पाऊल उचलले नाही, याकडेही सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लक्ष वेधले.
बातम्या आणखी आहेत...