आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Deputy President Rahul Gandhi At Mumbai

राहुल गांधींनी घेतली मुंबईत कॉंग्रेस पदाधिकार्‍यांची हजेरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना शुक्रवारी नेते आणि पदाधिकार्‍यांची हजेरी घ्यावी लागली. एक दिवसाच्या मुंबई भेटीवर आलेल्या राहुल यांनी आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करून सूचना दिल्या. काँग्रेसमध्ये सर्वांसाठी एक नियम असेल आणि कोणालाही झुकते माप दिले जाणार नाही, असे त्यांनी बजावले.
दरम्यान, पक्ष आणि सरकार यांच्यात समन्वय नसल्याची तक्रार काही पदाधिकाºयांनी केली. आपण केवळ कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी आल्याचे राहुल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे नमूद करून दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊ, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आले तर गुरुदास कामत फिरकलेच नाहीत.

मोहन प्रकाश टार्गेट
मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष वसंत ननावरे यांनी प्रभारी मोहन प्रकाश यांच्याविरोधात नाव न घेता तक्रार केली. आपण 38 वर्षे काँग्रेसमध्ये असून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर ज्यांनी पडत्या काळात टीका केली तेच लोक आज राज्याचे प्रभारी झाल्याचे ते म्हणाले. असे लोक आमच्या मुख्यमंत्र्यांना बदनाम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.