आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवमान खटला सुनावणीचे प्रथमच व्हिडिओ रेकॉर्डिंग, वकिलाने हायकोर्टाचा अवमान केल्याचे प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध दाखल एका प्रकरणात नागपुरातील वकील अॅड. सतीश उके यांनी न्यायालयावरच गंभीर आरोप केल्याने या अवमान प्रकरणाच्या सुनावणीचे बुधवारी नागपूर खंडपीठाच्या इतिहासात प्रथमच ऑडिअाे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेे. न्यायालयाने उके यांना ८ मार्चपर्यंत शपथपत्र देण्यास सांगितले.
 
फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या शपथपत्रात त्यांच्यावरील फौजदारी गुन्हे दडवल्याचा आरोप करणारी याचिका अॅड. उके यांनी दाखल केली होती. उके यांनी त्याची सुनावणी करणारे न्या. आर. के. देशपांडे यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते.
 
त्या आरोपांची  स्वत:हून दखल घेत न्यायालयाने उकेंविरुद्ध फौजदारी अवमान याचिका दाखल केली. त्यावर न्या. प्रसन्ना वराळे आणि न्या. झेड. ए. हक यांच्या विशेष पीठासमोर सुनावणी सुरू आहे
 
न्यायालयाने अॅड. उके यांना मागील सुनावणीत २२ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. तसे न करता त्यांनी न्यायालयावरच आरोप केल्याने नवी अवमान याचिका दाखल करण्यात आली. 
 
प्रथमच व्हिडीओ रेकॉर्डिंग : मागील सुनावणीत उके यांनी सुनावणीचे मोबाइलने व्हीडिओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर आक्षेप घेत न्यायालयाने त्यांना रेकॉर्डिंग करावयाचे असल्यास लेखी अर्ज देण्याचे आदेश दिले होते. उके यांनी लेखी अर्ज दिल्यावर बुधवारी सुनावणीचे ऑडियो तसेच व्हीडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले.  
 
यासाठी दोन व्हिडीओ कॅमेरे, एक मायक्रोफोन लावण्यात आला आहे. तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास दोन तंत्रज्ञदेखील उपस्थित होते. नागपूर खंडपीठाच्या इतिहासात सुनावणीचे रेकॉर्डिंग करण्याचा हा पहिला प्रसंग. त्यामुळे वकिलांनी सुनावणीच्या वेळी गर्दी केली होती.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...