आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आघाडी तुटल्यानंतर काँग्रेसच्या प्रचाराचा उद्या तुळजापुरातून प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधानसभा निवडणुकीला स्वबळावर सामोरे जात असलेल्या काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी (३० सप्टेंबर) रोजी तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथून होणार आहे.
दुपारी दीड वाजता त्यांची पहिली प्रचार सभा होईल. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, निवडणूक जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे, समन्वय समितीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, प्रचार समितीचे अध्यक्ष नारायण राणे, माध्यमे प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्यासह राज्यातील अनेक प्रमुख नेते, मराठवाड्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.