आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी सोलापुरचे माजी आमदार दिलीप माने काँग्रेसचे उमेदवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर / मुंबई / नाशिक- नारायणराणे यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेसने सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांचे नाव पुढे केले. रविवारी झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत त्यांचे नाव निश्चित झाले तरी दिल्लीत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. 


राणे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ असे भाजपने सांगितले होते. मात्र त्यांचा पत्ता कट झाला. भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी वा प्रसाद लाड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 


शिवसेनेच्या दबावामुळे रविवारी अचानक या घडामोडी घडल्या. त्यांचा उमेदवार ठरल्यानंतर प्रदेश काँग्रेसच्या कोअर समितीची बैठक झाली. तीत सोलापूरचे माने यांनाच मैदानात उतरवण्याचा निर्णय झाला. या निर्णयात पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विधिमंडळातील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माणिकराव ठाकरे, नसीम खान, अॅड. गणेश पाटील आदींचा सहभाग आहे. हा निर्णय त्यांनी तातडीने मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला कळवला. तिथूनही होकार आल्याने हा प्रस्ताव तातडीने दिल्लीला पाठवला. 


श्री. माने हे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे मानसपुत्र म्हणून आेळखले जातात. माजी महसूलमंत्री पतंगराव कदम यांचे ते कट्टर समर्थक आहेत. २००९ मध्ये ते दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांना याच मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. विद्यमान सहकार, पणन आणि वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख त्यांचे प्रतिस्पर्धी होते. 


कोण आहेत दिलीप माने? 
सोलापूरचे माजी आमदार ब्रह्मदेवदादा माने यांचे सुपुत्र. त्यांच्यापासूनच राजकीय वारसा मिळाला. विद्यार्थीदशेपासूनच राजकीय धडे गिरवत त्यांनी निवडणुका लढवल्या. उत्तर सोलापूर पंचायत समिती सभापती झाले. आमदार (२००९ ते २०१४), कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, सिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष, बीएमआयटी या तंत्रनिकेतन अभियांत्रिकीचे संस्थापक आहेत. 


‘राणे हे एनडीएच्या घटक पक्षाचे सदस्य अाहेत. मात्र अाम्ही मित्रपक्षाचा नव्हे तर भाजपचाच उमेदवार या निवडणुकीत देणार अाहाेत. साेमवारी सकाळी त्याचे नाव अधिकृत जाहीर केले जाईल,’ असे दानवे यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. राणेंचा पत्ताच कट झाल्यामुळे शिवसेनेचा पाठिंबा अापल्याला मिळेल असा विश्वास भाजप नेत्यांना वाटताे. राणेंना उमेदवारी मिळाल्यास काँग्रेसने संदेश पारकर यांना उमेदवारी देण्याची तयारी केली अाहे. मात्र भाजपकडून राणेंना उमेदवारी दिली जाणार नसल्याचे संकेत मिळाल्याबराेबर काँग्रेसने माजी अामदार दिलीप माने यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केले. 

बातम्या आणखी आहेत...