आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यशाने काँग्रेसचा हुरूप वाढला, विरोधी पक्षनेतेपदावर डोळा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नुकत्याच झालेल्या विधान परिषदेत निवडणुकीतील यशामुळे काँग्रेसला नवीन ताकद मिळाली आहे. राष्ट्रवादीच्या दबावाला यापुढे बळी न पडता विधान परिषदेतील विराेधी पक्षनेतेपदाबरोबर सभापतिपदही खेचून आणण्यासाठी काँग्रेसचे नेेते आता सरसावले आहेत. डिसेंबर २०१६ अखेर विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुका होणार असून यात राष्ट्रवादीला मागे टाकण्याची रणनीती आखण्यात येत असल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्याने दिली.

नुकताच सहा जागांसाठी झालेल्या विधान परिषद निवडणुकांचा निकाल लागला. यात राष्ट्रवादीला तीन जागांचा फटका बसला, तर काँग्रेसला एका जागेचा फायदा झाला आहे. सद्य:स्थितीत विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे २३, तर काँग्रेसचे २० आमदार असे बलाबल आहे. त्यात आता नाशिक आणि अमरावती या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक डिसेंबर २०१६ पर्यंत होणार आहे. याचबरोबर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूकही याच कालावधीत होणार आहे. या पाच जागांपैकी नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे हे विद्यमान आमदार आहेत. तांबे यांनाच काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिली असून त्यांच्या विजयासाठी काँग्रेस संपूर्ण ताकद लावणार आहे. तांबे विजयी झाल्यास काँग्रेसची विधान परिषदेतील संख्या २१ होईल. आताच्या संख्याबळाचा विचार केला असता राष्ट्रवादीला मागे टाकण्यासाठी काँग्रेसला आणखी तीन जागांची गरज लागणार आहे. त्यामुळे अमरावती पदवीधर मतदारसंघासह उर्वरित तीन शिक्षक मतदारसंघात विजयासाठी जोरदार प्रयत्न करण्यासाठी काँग्रेसने पावले उचलली आहेत. यात औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचाही समावेश असून येथून राष्ट्रवादीचे विक्रम काळे विद्यमान आमदार आहेत. काळेंविरोधात व्यूहरचना यशस्वी झाल्यास काँग्रेसचा राष्ट्रवादीला दिलेला तो सर्वात मोठा फटका असेल. प्रसंगी काँग्रेसने पडद्यामागून भाजपचीही मदत घेण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे बोलले जाते. काँग्रेसबरोबर धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारायच्या आणि हातमिळवणी मात्र भाजपशी करायची, हे राष्ट्रवादीचे डावपेच त्यांच्या अंगावर उलटवण्याचा काँग्रेसचे नेते विचार करत आहेत.
पुढे वाचा... नारायण राणेंकडे सूत्रे
बातम्या आणखी आहेत...