आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचाही जाहीरनामा प्रसिद्ध: ज्येष्ठ नागरिकांना 1000 रूपये पेन्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज दुपारी मुंबईत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता काँग्रेस पक्षानेही जाहीरनामा जाहीर केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी माणिकराव ठाकरे म्हणाले, समाजातील सर्व तळागाळातील घटकांशी चर्चा केल्यानंतर हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यानुसार काँग्रेस पक्ष पुढील 5 वर्षे काम करीत राहील.
पुढे पाहा काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ठळक बाबी...
- प्रत्येक गाव पक्क्या रस्त्याने जोडणार
- शिक्षणाच्या अधिकाराची पूर्ण अंमलबजावणी करणार
- पुढील पाच वर्षात म्हाडाच्या वतीने सर्वांना परवडतील अशी एक लाख घरे बांधणार
- ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 वरुन 60 करणार
- सर्व ज्येष्ठ नागरिकांना 600 ऐवजी 1000 रुपये पेन्शन देणार
- घरगुती कामगारांना वयाची 55 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 25 हजार रुपये आर्थिक मदत देणार
- राज्यातील कामगारांचे किमान मासिक वेतन आणि बोनसची रक्कम 12 हजार करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार
- राज्यात महिला स्पेशल पोलिस स्टेशनची स्थापन करणार.