आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या पत्नींची ‘घरवापसी’ केव्हा? काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांची मुक्ताफळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटनांतर्फे राबविण्यात येणाऱ्या घरवापसी कार्यक्रमाचा संदर्भ देत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांची गाडी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच घसरली. ‘मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांची घरवापसी कधी होईल?’, असा खोचक प्रश्न विचारतानाच ‘मोदींना सर्वत्र स्मृती इराणी किंवा आनंदीबेन दिसतात, मात्र जशोदाबेन का दिसत नाहीत’, अशी मुक्ताफळेही त्यांनी उधळली.

केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार व मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांविराेधात काँग्रेसने मंगळवारी आझाद मैदानावर माेर्चा काढला हाेता. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर, गुरुदास कामत, आमदार भाई जगताप, सुरेश शेट्टी अादींची या वेळी उपस्थिती हाेती. या वेळी कामत यांनी घरवापसीच्या प्रकरणावरून मोदींची खिल्लीही उडवली. तसेच बेटी बचाओ अभियानही केवळ माेदींचा भंपकपणा असल्याचे ते म्हणाले. ‘मोदींना जर महिलांविषयी इतकाच आदर आहे तर आपल्या पत्नीविषयी ते आदराने का वागत नाहीत? त्यांची घरवापसी करून त्यांना सन्मान आणि हक्क कधी मिळवून देणार आहेत? मोदी यांना सगळीकडे स्मृती इराणी आणि आनंदीबेनच का दिसतात, आपल्या पत्नी का दिसत नाही? मोदी हे तर इराणी यांना दिल्लीत आपल्या बाजूलाच घर द्यायला निघाले होते,’ अशी मुक्ताफळे कामतांनी उधळली.

काळ्या पैशाचे काय?
केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी खोटी आश्वासने देऊन माेदींनी भारतातील कोट्यवधी जनतेची घोर फसवणूक केली. शंभर दिवसांत परदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येक भारतीयांच्या खात्यांवर १७ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते, परंतु सात महिन्यांनंतर या आश्वासनाचे काय झाले हे पाहण्यास मोदींनी वेळ नसल्याचेही कामत म्हणाले.

कामतांचे संतुलन बिघडले : भंडारी
"कामत यांनी पंतप्रधानांबद्दल जी मुक्ताफळे उधळली आहेत, त्याचा मी धिक्कार करते! प्रत्येक स्त्रीमध्ये यांना फक्त मादीच दिसते का, असा सवाल करत भाजप प्रदेश प्रवक्त्या कांता नलावडे यांनी केला. अशा विकृत नेत्याचा आम्ही धिक्कार करतो. हा सर्व महिलावर्गाचा अपमान आहेच तद्वत या देशाचाही हा अपमान आहे. त्यांनी देशाच्या पंतप्रधानांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी कांता नलावडे यांनी केली. दुसरीकडे, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनीही कामतांचा समाचार घेतला अाहे. ‘सत्ता गेल्याने कामत यांचे मानसिक संतुलन बिघडले अाहे,’ अशी टीका केली.