आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी काँग्रेसचा आजही सक्रिय सदस्य, निवृत्तीबाबत मी कधीच बोललो नाही- गुरूदास कामत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसचे नेते गुरूदास कामत... - Divya Marathi
काँग्रेसचे नेते गुरूदास कामत...
मुंबई- मी राजकारणातून निवृत्ती घेतोय असे यापूर्वी कधीही म्हणालो नव्हतो. तेव्हा फक्त मी आपले सरचिटणीसपद सोडत असल्याचे आणि मला इतर दुसरे कोणतेही पद घेण्यास रस नाही असे म्हणालो होतो, अशी भूमिका माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे माजी सरचिटणीस गुरुदास कामत यांनी मांडली आहे. दैनिक भास्कर समूहाशी बोलताना त्यांनी हे मत मांडले. माझ्याविरोधात खोट्या बाबी पसरविल्या जातात....
 
- गुरुदास कामत म्हणाले, ज्या लोकांना माझ्या सक्रीय राहण्याने धोका वाटतो किंवा माझ्या असण्याने त्यांचे पित्त खवळते ते लोक माझ्याबाबत खोट्या बाबी पसरवतात. माझ्या बाबत आमच्याच पक्षातील तीन नेते पत्रकारांना चुकीची माहिती देतात अशी मला खात्री आहे.
- कामत म्हणाले की, मी फेरीवाल्यांची आणि उत्तर भारतीय लोकांबाबत भूमिका मांडली. तसेच राज ठाकरेंना खुले आव्हान दिले पण माझ्याविरोधात सोशल मिडियात घाणेरड्या शब्दाचा वापर केला गेला.
- माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या कामत यांनी पुढे सांगितले की, मी जेव्हा मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 15 दिवसात मी माझ्या लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क अभियान सुरु केले होते. यानंतर मी जेव्हा यावर्षी मे महिन्यात पक्षाच्या सरचिटणीसपदाचा रादीनामा दिल्यानंतर मी दर शनिवार-रविवार माझ्या भागातील लोकांशी भेटत असतो. वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो. याचा पुरावा माझे फेसबुक व टि्वटर अकाऊंट आहे. ज्यावर तारखेसह सर्व माहिती उपलब्ध होऊ शकते.
- मी तेव्हाही म्हटले होते की, मला सध्या कोणतेही पद नको आहे. मी फक्त काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, शिपाई म्हणून कार्यरत राहीन.
 
सक्रिय राजकारणातून मी निवृत्त झालेलो नाही-
 
- राजकारणातील सक्रियतेबाबत विचारले असता कामत म्हणाले, मी जेव्हा पक्षाकडे सरचिटणीसपद सोडण्याची विनंती करत राजीनामा दिला तेव्हा मला कोणतेही पद नको असे म्हटलेले होते. इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही, काँग्रेस पक्षातच एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करेन असे म्हटले होते. जे मी आजपर्यंत करत आलो आहे. यावरून मी राजकारणातून निवृत्त झालो असे कोणी कसे म्हणू शकेल. 
- मी भविष्यातही काँग्रेस पक्षात सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहे याचा अर्थ राजकारणात आहे असाच होतो. मला फक्त कोणतेही पद नको आहे असे मी पक्षश्रेष्ठींना कळवले होते.
 
राहुल गांधींच्या नेहमीच संपर्कात असतो-
 
- कामत पक्षांतर्गत विरोधकांकडे बोट दाखवून म्हणाले की, माझे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी जमत नाही असे दाखविण्याचा प्रयत्न माझे काही हितशत्रू करत असतात. पण हे सर्व खोटे आहे. माझा मागील महिन्यात 5 ऑक्टोबरला वाढदिवस झाला. - माझ्या वाढदिवशी राहुल यांनी मला खूप छान शुभेच्छा संदेश पाठवला होता. तो संदेश मी माझ्या फेसबुक व टि्वटरवर सुद्धा पोस्ट केला होता. हा संदेश लाखभर लोकांनी लाईक केला होता. मागील सहा महिन्यात मी सोनिया किंवा राहुल गांधी यांना कोणतेही पत्र लिहलेले नाही असेही कामत यांनी सांगितले.
 
गुजरातबाबत राहुलजींना सल्ला देतो-
 
- मी पक्षाचा सरचिटणीस असताना राजस्थान व गुजरातचा प्रभारी होतो. त्यामुळे मला तेथील ब-यापैकी माहिती आहे. आता गुजरात निवडणुकीबाबत राहुलजी माझ्याशी चर्चा करतात. मी त्यांना काही माहिती देत असतो. 
- पक्षाला जेथे काही माझी गरज भासते तेव्हा मी मदत करत असतो. राहुलजी आणि मी एसएमएस आणि टि्वटरच्या माध्यमातून सातत्याने संपर्कात असतो. पक्षात कोणतेही पद नसल्याचे भेट होत नाही पण आम्ही संपर्कात आहे असेही कामत यांनी सांगितले. 
- जे लोक माझ्याविरोधात काही गोष्टी पेरतात त्यांना राहुल गांधी काहीही महत्त्व देत नाहीत किंवा त्यांना माझ्याप्रमाणे वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत नसावेत असे सांगत पक्षातंर्गत दोन-तीन नेत्यांवर टीका केली.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...