आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिवंडी:काँग्रेस नेते मनोज म्हात्रेंची कोयत्याने वार करुन हत्‍या, चुलतभावाविरुद्ध गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रात महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वातावरण तापले आहे. भिवंडी  मात्र, राजकीय वैर उफाळून आले आहे. विरोधी गटाच्या हल्लेखोरांनी काँग्रेसचे पालिका सभागृह नेते मनोज अनंत म्हात्रे (53, रा. कालवार) यांची निर्घृण हत्या केली.  हल्लेखोरांनी म्हात्रे यांच्यावर रिव्हाल्वरमधून गोळ्या झाडल्या. नंतर त्यांच्यावर कोयत्याने वार केले. मंगळवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी त्यांचे चुलतभाऊ प्रशांत म्हांत्रें यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

रामनगर येथील समर्थक उमाशंकर उर्फ मुलायम यादव यांना विरोधकांनी धमकावल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी यासाठी म्हात्रे नारपोली पोलिस ठाण्यात गेले होते. तेथून ते ओसवालवाडी येथील राहत्या घरी येत असताना वाटेत दबा धरून बसलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार केले. रिव्हॉल्वरने तीन गोळ्या झाडण्यात आल्या. यातील दोन गोळ्या वर्मी लागल्याने ते जागीच कोसळले. या घटनेनंतर त्यांना तातडीने ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यापूर्वीही म्हात्रेंवर कामतघर येथे गोळीबार झाला होता. त्यात ते थोडक्यात बचावले होते. 
 
पुढील स्लाईडवर बघा, मनोज म्हात्रे यांच्या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ.....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...