आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रेंची हत्या कौटुंबिक कारणातूनच, दोन्हीही हल्लेखोरांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भिवंडी येथील काँग्रेसचे नगरसेवक मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी दोन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही हल्लेखोरांनी आपणच हत्या केल्याचे कबुल केले आहे. महेश पंडित म्हात्रे आणि मयूर प्रकाश म्हात्रे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मनोज म्हात्रे यांची हत्या राजकीय वैमनस्यातून नाही, तर कौटुंबिक कारणातूनच झाल्याचं समोर आलं आहे. 

रामनगर येथील समर्थक उमाशंकर उर्फ मुलायम यादव यांना विरोधकांनी धमकावल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी यासाठी म्हात्रे नारपोली पोलिस ठाण्यात गेले होते. तेथून ते ओसवालवाडी येथील राहत्या घरी येत असताना वाटेत दबा धरून बसलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार केले. रिव्हॉल्वरने तीन गोळ्या झाडल्या होत्या. यातील दोन गोळ्या वर्मी लागल्याने ते जागीच कोसळले. या घटनेनंतर त्यांना तातडीने ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...