आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेते म्हात्रे हत्येप्रकरणी चुलत भावावर गुन्हा, राजकीय वादातून हत्या झाल्याचा संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भिवंडी महापालिकेतील काँग्रेसचे सभागृह नेते मनाेज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा चुलत भाऊ  प्रशांत म्हात्रेसह आठ जणांविरोधात पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला. दरम्यान, राजकीय वादातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय अाहे.

मंगळवारी रात्री हल्लेखाेरांनी म्हात्रे यांच्यावर गाेळ्या झाडून काेयत्याने वार करून त्यांची हत्या केली. रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या म्हात्रे यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले. मात्र, डाॅक्टरांनी त्यांना तपासून मृत घाेषित केले. मनोज म्हात्रे हे भिवंडीतील अंजूरफाटा परिसरात राहत होते. रात्री साडेअाठ वाजता काम अाटाेपून परतत असताना घराजवळच हल्लेखाेरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. काही दिवसांपूर्वी म्हात्रेंवर भिवंडीतच हल्ला करण्यात अाला हाेता. मनोज यांचा चुलत भाऊ प्रशांत याला आगामी भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीसाठी तिकीट पाहिजे होते.
 
मात्र, त्याला तिकीट मिळाले नाही. त्यामुळे त्याने मनोज म्हात्रेंच्या हत्येचा कट रचला. यात म्हात्रेंचा चालकही सहभागी आहे. दरम्यान, म्हात्रेंवर हल्ला करणाऱ्या अाराेपींमध्ये भाजपच्या एका पदाधिकाऱ्याचा समावेश अाहे, असा अाराेप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केला अाहे.
बातम्या आणखी आहेत...