आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणे: कधी काळी सक्रिय गॅंगचा सदस्य आज आहे \'पॉवरफूल\' नेता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र काँग्रेसवर सध्या वाईट दिवस आले आहेत. लोकसभेत पानीपत झाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नेतेही सैरबैर होऊ लागले आहेत. राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देत पक्षाला झटका दिला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हटवावे या मागणीसाठी राणेंसह राज्यातील काही काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न केले मात्र यश आले नाही. हायकमांडने चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्याच नेतृत्त्वाखाली निवडणूका लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नाराज होऊन राणे यांनी राजीनामा दिला आहे. असे असले तरी राणे काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे म्हणत आहेत.
मूळचे शिवसैनिक राहिलेल्या राणेंनी राज्याचे मुख्यमंत्रीपदही भूषविले आहे. त्यापूर्वी नगरसेवक ते मंत्रीपद असा त्यांचा प्रवास राहिला आहे. जुलै 2005 मध्ये त्यांनी शिवसेनेचा त्याग करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता तेथेही मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने पक्षात बंड करण्यास सुरुवात केली आहे. राणेंचा स्वभाव सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. राजकारणात संयम लागतो मात्र तोच राणेंकडे नसल्याने ते जेथे जातात तेथे बंडाची भाषा करतात. यामागे त्यांचा मूळ स्वभाव व पार्श्वभूमी असल्याचे दिसून येते. तर पुढे पाहूया काय नारायण राणेंची पार्श्वभूमी... वाचा पुढे....
60 च्या दशकात ह-या ना-या ग्रुपशी जोडले होते राणे- नारायण राणेंचा जन्म 10 एप्रिल 1952 रोजी कोकणात झाला. इंग्रजी मॅगझीन आऊटलुकच्या माहितीनुसार, 60 च्या दशकात नारायण राणे मुंबईच्या चेंबूर भागात सक्रिय असलेल्या ह-या ना-या गॅंगचे सदस्य होते. त्यांच्याविरोधात त्या काळात हत्येचे गुन्हे दाखल झाले होते. त्या काळात 'ह-या ना-या जिंदाबाद' नावाचा एक चित्रपटही येऊन गेला होता. नाराण राणे यांच्याविरोधात मुंबईतील घटला पोलिस ठाम्यात एक एफआयआरही दाखल आहे.
पोलिस रिकॉर्डच्या माहितीनुसार, नारायण राणे जेव्हा 14 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या गॅंगमधील सदस्य माधव ठाकुरने राणेंना जबरी मारहाण केली होती. त्यानंतर राणेंनी गुन्हेगारीकडे मार्ग वळविला. काही दिवसानंतर गुंडागर्दी करीत शिवसेनेत दाखल झाले व शाखाप्रमुख बनले. त्यानंतर मुंबई महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक बनले.
राणेंबाबत आणखी पुढे वाचा....