आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनातन संघटनेला राज्य सरकारचेच अभय : राणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि सनातनच्या वादात काॅंग्रेसचे अामदार नितेश राणे माजी मुख्यमंत्री नारायण राणे या पिता- पुत्रांनीही उडी घेतली आहे. ‘सनातन हे भाजप सरकार आणि संघाचे पिल्लू असून सनातनला पैसा भाजपच पुरवतो,’ असा अाराेप नारायण राणे यांनी केला. सनातनने धमक्या देणे बंद करावे, अन्यथा लोकांनी हातात कायदा घेतला तर सनातन संस्था शिल्लक राहणार नाही, असा इशाराही राणेंनी शुक्रवारी दिला.
‘श्रीपाल सबनीस मॉर्निंग वॉकला जात चला’, अशी अप्रत्यक्ष धमकी सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी दिली होती. त्यावर स्वाभिमान संघटनेचे नेते नितेश राणेंनी गुरुवारी सबनीसांची पुण्यात भेट घेऊन पाठिंबा दिला होता. तसेच गोळ्यांना गोळ्यांनीच उत्तर देऊ, असा इशारा यांनी दिला हाेता. त्या पाठोपाठ नारायण राणेंनीही सनातनला धारेवर धरले. राज्य सरकाराचे अभय असल्यािशवाय सनातनेचे साधक उजळ माथ्याने िफरले नसते. िवरोधात बोलणाऱ्यांना धमकी देऊन आवाज बंद करणे आणि आम्ही बोलू तेच खरे, अशी सनातनची अरेरावी सुरू आहे. असेच सुरू राहिले तर लोक कायदा हातात घेतील आणि सनातन संस्था जागेवर राहणार नाही. लोकांना मार्निंग वॉकच्या धमक्या देतात, मग तुम्ही नाही चालणार का रस्त्यावरुन ? असा इशाराही राणेंनी दिला.

सबनीसांना सल्ला
श्रीपालसबनीस यांनीही साहित्य संमेलनापुरते मर्यादित राहावे. उगाच राजकारण करू नये. ज्याचे काम त्यानेच करावे, असा सल्लाही नारायण राणेंनी दिला.
बातम्या आणखी आहेत...