आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोकर्णा भाजपत दाखल; परदेशी गेलेल्या प्रदेशाध्यक्ष अशाेकरावांना धक्का !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक व माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांनी मंगळवारी मोदी सरकारची पुण्यतिथी साजरी करण्याची घोषणा केली होती. त्याच दिवशी पोकर्णा यांनी भाजपत प्रवेश केल्याने चव्हाणांना चांगलाच धक्का बसला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. अशोकरावांचे वडील व माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे निटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.

याआधीही त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र तेथे ते फार काळ टिकले नाहीत. ते पुन्हा आपल्या मूळ पक्षात परतले होते. अशोकरावांच्या नेतृत्वात काँग्रेस मोदी सरकारची पुण्यतिथी साजरी करत असतानाच ते भाजपत दाखल झाले.

चव्हाण परदेशात
चव्हाण यांनी मोदी सरकारची पुण्यतिथी सासजरी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यात विविध ठिकाणी पक्षातर्फे कार्यक्रमही झाले. पण ही घोषणा करणारे अशोकरावच परदेशात गेले आहेत.
बातम्या आणखी आहेत...