आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Leader Premanand Raupwate May Join In Shivsena Today

काँग्रेस नेते प्रेमानंद रूपवते शिवसेनेत प्रवेश करणार, शिर्डीतून लोकसभेचे तिकीट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनेचे आमदार व शिर्डी मतदारसंघातील उमेदवार बबनराव घोलप यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर ते उमेदवारी अर्ज भरण्यास अपात्र ठरले आहेत. त्यामुळे शिवसेनेने घोलप यांच्या जागेवर नवा उमेदवार शोधण्याचा प्रयत्न सुरु केला असून, त्यांना त्यात यश आल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कॉँग्रेस नेते प्रेमानंद रुपवते आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज ते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करतील. तसेच त्यांना लोकसभेचे तिकीट देण्यात येईल.
घोलप यांना शिक्षा झाल्यानंतर शिवसेना नेतृत्वापुढे अचानकपणे शिर्डीतून कोणाला उमेदवारी द्यायची असा यक्ष प्रश्न समोर आला. त्यानंतर लागलीच घोलप यांच्या जागी नवा उमेदवार देण्याबाबत बैठका सुरू झाल्या आहेत. घोलप यांची मुलगी नयना वालझडे, लहू कानडे व सदाशिव लोखंडे यांच्या नावावर चर्चा झाल्या. मात्र, नयना या नाशिकच्या महापौर असताना त्यांच्यावर काही आरोप झाले होते, त्यामुळे त्यांना तिकीट देणे कितपत योग्य ठरेल, यावरही खल झाला. शिवाय आता खुद्द घोलपांना सक्तमजुरी झाल्याने नयना मतदारांपुढे मत कसे मागणार असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यामुळे नयना यांच्या नावालाही पक्षनेतृत्त्वाने नकार दिल्याचे कळते.
लहू कानडे व सदाशिव लोखंडे यांच्या नावाची चर्चा असतानाच त्यानंतर स्थानिक शिवसेना नेत्यांनी काँग्रेसवर नाराज झालेले प्रेमानंद रुपवते यांच्याकडे विचारपूस केली. तसेच शिवसेनेत प्रवेश करा व तुम्हाला लोकसभेचे तिकीट देऊन रिंगणात उतरवू असे सांगितले. त्याला रूपवते यांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर रूपवते यांनी आपल्या समर्थकांशी चर्चा करून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज दिवसभरात ते शिवसेनेत प्रवेश करतील व त्यांना शिर्डीचे तिकीट मिळेल असे सांगण्यात आले.
पुढे वाचा, शिवसेनेलाही फोडावा लागला काँग्रेस नेता...