आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Leader Vinayak Nimhan Rejoins In Shivsena

विनायक निम्हण पुन्हा शिवसेनेत, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर घरवापसी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातील काँग्रेसचे माजी अामदार विनायक निम्हण यांनी बुधवारी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निम्हण यांनी ‘शिवबंधन’ बांधले. 2005 साली विनायक निम्हण यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणेंसह शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सुमारे दहा वर्षांनंतर निम्हण यांची पुन्हा घरवापसी झाली आहे. उद्धव ठाकरेंनी निम्हण यांच्याकडे शिवसेनेच्या पुणे शहरप्रमुखपदाची तत्काळ जबाबदारी साेपवली.
राणे यांचे काँग्रेस पक्षात महत्त्व कमी झाल्यानंतर निम्हण यांनी अाधी अशाेक चव्हाण व नंतर पृथ्वीराज चव्हाण या तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधत अापले महत्त्व पक्षात वाढवण्याचा प्रयत्न केला हाेता. मात्र विधानसभा निवडणुकीत निम्हण यांना भाजपच्या उमेदवारांकडून पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून ते काँग्रेसमध्ये अस्वस्थ होते. निवडणुकीच्या आधीही निम्हण यांनी भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केला होता. अखेर त्यांनी आपल्या मूळ पक्षात म्हणजेच शिवसेनेत प्रवेश केला आहे.