आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Leaders Come On Road For Farmers Debt Free

शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी काँग्रेस नेते उतरले रस्त्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी काॅंग्रेसच्या वतीने गुरुवारी राज्यभर अांदाेलने करण्यात अाली. अनेक शहरांत जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चे काढण्यात अाले, या अांदाेलनात माेठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. अाता शुक्रवारीही अांदाेलनाच्या दुस-या टप्प्यात उर्वरित शहरात माेर्चे काढण्यात येणार अाहेत.
प्रदेशाध्यक्ष खासदार अशाेक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये माेर्चा काढण्यात अाला. भाजपच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर त्यांनी कडाडून हल्ला चढवला. शेतक-यांबाबत दोन्ही सरकारांनी झोपेचे सोंग घेतल्यामुळे त्यांना अाम्ही खडबडून जागे करणार असल्याचेही चव्हाण म्हणाले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील नगरमध्ये अांदाेलन करण्यात अाले. या अांदाेलनानंतरही सरकार शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय होणार नसेल तर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा विखे पाटील यांनी दिला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढण्यात अाला.
ककाढण्यात अाला. भाजपचे सरकार शेतक-यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप राणे यांनी यावेळी केला. तर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरात अांदाेलन करण्यात अाले. आमदार माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यात तर माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथे मोर्चा निघाला.

ठाण्यात लाठीमार
माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात अांदाेलन करण्यात अाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माेर्चा पोहोचल्यावर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. खान आणि आमदार संजय दत्त यांनी या लाठीमाराचा तीव्र निषेध केला. शांततामय व विधायक मार्गाने आंदोलन करणा-या कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्याच्या या घटनेवर विधिमंडळात जाब विचारू, असा इशारा दोन्ही नेत्यांनी दिला.