आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Leadership Is Seriously Mulling A Change Of Chief Minister In Maharashtra

\'पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदावरून विधानसभा निवडणुकीपूर्वीच गच्छंती?\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेस हायकमांड मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा गंभीर विचार करीत असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
इंग्रजी वृत्तपत्र 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्यासाठी काँग्रेस हायकमांडवर पक्षातील आमदारांचा व सहकारी पक्ष राष्ट्रवादीचा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुख्यमंत्री चव्हाणांचे संथ गतीने चालणारे काम व पक्षात समन्वय नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत. राष्ट्रवादीनेही चव्हाण यांच्या कार्यशैलीबाबत वारंवार जाहीर व पक्षाच्या पातळीवर नाराजी व्यक्त केली आहे. आता पक्षातील आमदारांनीही तीच री ओढल्याने काँग्रेस हायकमांड चव्हाण यांच्याजागी इतर नावांचा विचार करीत आहेत. यात सर्वात पुढे आहेत ते पक्षातील दलित चेहरा सुशीलकुमार शिंदे यांचे.
2004 साली पक्षाला पुन्हा सत्ता मिळवून दिल्यानंतरही काँग्रेसने शिंदेंऐवजी विलासराव देशमुखांना मुख्यमंत्रीपदी बसवले होते. शिंदेंचे पक्षातील सर्व नेत्यांशी तसेच राष्ट्रवादीशी चांगला समन्वय असल्याने त्यांच्या नावावर विचार सुरु आहे. मात्र, महाराष्ट्रातील राजकारणावर प्रभाव असलेल्या मराठी समाजाशिवाय इतरांना मुख्यमंत्रीपद देणे संयुक्तिक ठरेल का असाही पक्षात एक प्रवाह आहे. त्यामुळे शिंदेंसोबतच सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावावरही चर्चा होत आहे. उद्योगमंत्री नारायण राणेंचे नाव साधे चर्चेतही नाही.
पक्षातील आमदार व सहकारी पक्ष राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्री चव्हाणांच्या बाबतीत काय समस्या आहेत, वाचा पुढे....