आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची संगत नकाेच! नेत्यांची राहुल गांधींकडे मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राज्यात रिक्त हाेत असलेल्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी हाेणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी कांॅग्रेससाेबत अाघाडी करू नये, अशी अाग्रही मागणी महाराष्ट्रातील कांॅग्रेस नेत्यांनी मंगळवारी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमवेत दिल्लीत झालेल्या बैठकीत केली. तसेच यदाकदाचित अाघाडी झालीच तर राष्ट्रवादीने कांॅग्रेसकडे सध्या असलेल्या किमान तीन जागा कांॅग्रेससाठी साेडवून घ्याव्यात, अशी मागणीही करण्यात अाली.
प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण, पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी माेहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अाणि विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे बैठकीत सहभागी झाले हाेते. पाच डिसेंबर २०१६ राेजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ सदस्यांची मुदत संपत अाहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कांॅग्रेसचे पाच, कांॅग्रेसचे पाच, भाजपचे दाेन अाणि दाेन ठिकाणी अपक्ष उमेदवार रिंगणात अाहेत. यवतमाळ, भंडारा-गाेंदिया, सांगली-सातारा, अाैरंगाबाद, पुणे या जागा सध्या राष्ट्रवादी कांॅग्रेसच्या ताब्यात अाहेत. मात्र, अाता बदलत्या परिस्थितीत यवतमाळ अाणि गाेंदिया-भंडारा या ठिकाणी कांॅग्रेसचे स्थानिक नेते राष्ट्रवादी कांॅग्रेसला या जागा देण्यास तयार नाहीत. राष्ट्रवादीसाेबत अाघाडी झाली तरी अाम्ही कांॅग्रेसचा उमेदवार उभा करू अशा भावना स्थानिक नेत्यांनी पक्षाध्यक्ष साेनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी माेहन प्रकाश यांना यापूर्वीच कळविल्याही अाहेत.
गाेंिदया-भंडारा येथे राष्ट्रवादीच्या िवराेधात कांॅग्रेसचे िवद्यमान अामदार गाेपालदास अग्रवाल यांनी दंड थाेपटले अाहेत. ते अापल्या मुलाला या मतदारसंघातून िनवडणुकीच्या िरंगणात उतरवित अाहेत. या ठिकाणी भाजपची मदत मिळवण्याचा अग्रवालांचा प्रयत्न अाहे. तर यवतमाळामधील कांॅग्रेसच्या नेत्यांनीही दिल्ली गाठली अाहे. त्यात माजी मंत्री अॅड. शिवाजीराव माेघे, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, माजी मंत्री संजय देशमुख, माजी अामदार विजयाताई धाेटे, माजी अामदार नंदिनी पारवेकर, अनंत देवसरकार, वजाहत मिर्झा, डाॅ. नदीम यांचा समावेश अाहे. या सगळ्यांनीच अशाेक चव्हाण, माेहन प्रकाश, गुलाम नबी अाझाद, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी यवतमाळच्या जागेविषयी चर्चा केली.
कांॅग्रेसकडे अधिक मते असल्याने राष्ट्रवादी कांॅग्रेससाेबत अाघाडी न करणे अाणि कांॅग्रेस जिल्हा अध्यक्ष वामनराव कासावार यांना हटवून जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी व्हावी यासाठी माजी मंत्री प्रा. वसंत पुरके किंवा माजी मंत्री संजय देशमुख यांना जिल्हाध्यक्ष करावी, अादी मागण्या त्यांनी केल्या अाहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कांॅग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल अाणि माेहन प्रकाश यांच्यात अाघाडी करण्यासाठी मुंबईत बैठक झाली. मात्र, कांॅग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या भावना तीव्र असल्याने या बैठकीत काहीही निष्पन्न झाले नाही.

माणिकरावांच्या िवराेधातही राेष
माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या िवराेधात यवतमाळच्या स्थानिक कांॅग्रेस नेत्यांचा राेष अाहे. या जिल्ह्यात कांॅग्रेसची दुरवस्था हाेण्यास ठाकरेच जबाबदार असल्याचा अाराेप या नेत्यांचा अाहे. प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यवतमाळ जिल्ह्यातील नेतृत्व बदलण्यासाठी काेणतेही पाऊल उचलत नाहीत. माणिकराव ठाकरे हे माजी प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांच्या भावना समजून घ्या, एवढेच चव्हाण तक्रारदारांना सांगत असतात. मात्र, अाता अाम्ही शांत बसू शकत नाही, असे सांगून अाजी-माजी प्रदेशाध्यक्षाविराेधात यवतमाळच्या नेत्यांनी दिल्लीत तक्रारी सुरू केल्या अाहेत.
बातम्या आणखी आहेत...