आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे माणिकराव ठाकरे उपसभापतिपदी, बिनविराेध निवडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उपसभापतिपदी बिनविराेध झाल्यानंतर माणिकराव ठाकरे यांचे अभिनंदन करताना राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, अशाेक चव्हाण अादी. - Divya Marathi
उपसभापतिपदी बिनविराेध झाल्यानंतर माणिकराव ठाकरे यांचे अभिनंदन करताना राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, अशाेक चव्हाण अादी.
मुंबई - विधान परिषदेच्या उपसभापतिपदी काँग्रेसचे आमदार माणिकराव ठाकरे यांची शुक्रवारी पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी निवड झाली. शुक्रवारी दुपारी मध्यंतरानंतर सभागृहात मतदान प्रक्रिया सुरू झाली. भाजपचे उमेदवार विजय ऊर्फ भाई गिरकर यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी माणिकरावांची एकमताने निवड झाल्याचे जाहीर केले. काँग्रेसकडून ठाकरे तर भाजपकडून गिरकर यांनी उपसभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज गुरुवारी भरला होता. विधान परिषदेतील संख्याबळानुसार काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार ठाकरे यांची निवड होण्याची शक्यता असतानाच भाजपने उमेदवार उभा केल्याने मतदान घेण्याची वेळ अाली हाेती.

विधान परिषदेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संख्याबळ सत्ताधाऱ्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे सध्या सभापती आणि विरोधी पक्षनेता ही दोन्ही पदे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. तर आघाडीतील सूत्रानुसार उपसभापतिपद काँग्रेसला देण्याचे ठरले होते. यापूर्वी उपसभापतीपदी राष्ट्रवादीचेच वसंत डावखरे होते. मात्र, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत तीनपैकी दाेन जागा राष्ट्रवादीला व काँग्रेसला एकच जागा देण्याचा समझाेता अाघाडीत झाला हाेता. तसेच या बदल्यात उपसभापतिपद काँग्रेससाठी सोडायची अशी तडजोड झाली होती. त्यानुसार काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला. दरम्यान, उपसभापतिपदी निवड झाल्यानंतर ठाकरे यांचे सभापतींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, सुनील तटकरे यांच्यासह सर्वपक्षीय अामदारांनी अभिनंदन केले.

अाजवरची जबाबदारी
माणिकराव ठाकरे युवक काँग्रेसमधून आलेले नेतृत्व आहे. आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा मतदारसंघाचे विधानसभेत दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. शरद पवार अाणि विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी भूषवले अाहे. शेती अाणि ग्रामविकास त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत.
बातम्या आणखी आहेत...