आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress May Given New Face For Loksabha Election

काँग्रेस लोकसभेसाठी देणार नवे चेहरे, कोल्हापूरची जागा घेणारच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष विद्यमान खासदार व पराभूत उमेदवारांऐवजी नव्या दमाच्या चेह-यांना संधी देणार असल्याचे कळते. काल मुंबईत टिळक भवनात झालेल्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी हा सूर आळवला आहे. जुन्या व त्याच-त्याच चेह-यांना संधी दिली तर राज्यात काँग्रेसला फटका बसू शकतो. याबाबत पक्षाचे सरचिटणीस व राजस्थान विधानसभा निवडणुकीचे प्रभारी गुरुदास कामत यांनी भूमिका मांडली व पक्षातील बहुतेक सदस्य यावर सहमत झाले. राजस्थानमध्ये काँग्रेसने जुन्याच चेह-यांना संधी दिल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला. राज्यस्थानमध्ये 100 उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्यातील तब्बल 93 जणांचा पराभव झाला. मंत्र्यांपैकी केवळ मुख्यमंत्री अशोक गहलोत विजयी झाले. आता महाराष्ट्रात पुन्हा ती चूक करू नये अशी स्पष्ट भूमिका कामत यांनी मांडली.
महाराष्ट्रातही काँग्रेस आघाडीचे 15 वर्षे सरकार आहे. त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे जनतेचा रोष कमी करायचा असल्यास नव्या व चांगल्या उमेदवारांना संधी दिली पाहिजे असा सूर बैठकीत होता. याचबरोबर राज्यातील लोकसभेसाठी उमेदवार निवडीचे सर्व अधिकार पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव गुरुदास कामत यांनी मांडला असता तो एकमताने मंजूर करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी कायम ठेवण्यासंदर्भात राज्य स्तरावरील नेते आता नरमाईचे धोरण घेताना दिसत आहेत. राष्ट्रवादीबरोबर जागा वाटप झाले तरी कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळाली पाहिजे असे पक्षातील सर्वच नेत्याचे म्हणणे होते. सदाशिवराव मंडलिक यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले असल्याने ही जागा राष्ट्रवादीने आघाडीच्या सूत्रानुसार सोडली पाहिजे. 2004 साली भाजपचे खासदार राष्ट्रवादीत आल्यानंतर तेथील जागा राष्ट्रवादीला सोडली होती. आता त्याच न्यायाने कोल्हापूर जागा राष्ट्रवादीने सोडली पाहिजे. राजीव सातव यांच्यासाठी हिंगोलीची व कल्याणप्पा आवाडे यांच्यासाठी हतकणंगलेची जागा मागायला हवी तसेच त्या बदल्यात रायगड व औरंगाबाद किंवा जालना सोडण्याची काँग्रेसची तयारी असल्याचे कळते.