आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MIMचे आव्हान नितेश राणेंनी स्वीकारले, ड्रग्ज पुरविणा-याचे नाव केले जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुस्लिम तरूणांना आकर्षित करण्यासाठी एमआयएम पक्षातर्फे ड्रग्जचा वापर केला जातो, हा आमदार नितेश राणेंचा दावा खोटा आहे. हिम्मत असेल तर नितेश यांनी नाव जाहीर करावे असे आव्हान देणा-या एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांना नितेश राणेंनी झटका दिला. काँग्रेसचे आमदार असलेल्या नितेश यांनी टि्वट करून एमआयएमचे आव्हान स्वीकारतो असे सांगत ड्रग्ज पुरविणा-या पक्षाच्या कार्यकर्त्याचे नाव जाहीर केले आहे. एमआयएमला पुरावाच हवा असेल तर मी कब्रस्तान गोळीबार रोडवरील बशीर खानच्या नावापासून सुरुवात करीत आहे असे सांगत नितेश यांनी टि्वट केले आहे.
एमआयएम हा पक्ष मुस्लिम तरुणांसाठी धोकादायक आहे. या पक्षाने मुस्लिम तरुणांना ड्रग्जची सवय लावली आहे. वांद्रे पूर्व पोट निवडणुकीत हे आम्ही अनुभवले आहे. एमआयएम हा पक्ष मुस्लिम तरुणांना बिघडवण्याचे काम करत आहे. माझा हा आरोप सिद्ध करायचा असेल तर एमआयएमच्या कार्यकर्त्यांची ड्रग्ज चाचणी करायला हवी. यामधून सत्यता बाहेर येईल. वांद्र्याच्या निवडणुकीत एमआयएमकडून ड्रग्जचे वाटप होत असल्याचे आम्ही पाहिले आहे. प्रचारादरम्यान आम्हाला ते दिसून आले. म्हणूनच एमआयएम हा देशासाठी विघातक असा पक्ष आहे. त्यामुळे या पक्षावर बंदी घालायला हवी. ओवेसी बंधूंच्या भाषणामुळे कोणी एमआयएमकडे आकर्षित होत नसून कोकेन, गांजा, चरस याचा पुरवठा या पक्षाकडून होत असल्यानेच तरुणांचे लोंढे त्यांच्याकडे जातात,’ असा आरोप नितेश राणे यांनी गुरुवारी केला होता.
त्याला एमआयएमने प्रत्त्युत्तर दिले होते. नितेश यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांनी हे आरोप का केले, हा प्रश्नच आहे. त्यांनी असे काही होत असल्याचा अनुभव घेतला असेल तर तत्काळ पोलिसांना कळवायला हवे होते. ते निकालानंतरच्या दुस-या दिवसाची का वाट पाहत होते. अशा आरोपांना आम्ही किंमत देत नाही. आधी पुरावे द्या आणि मग बोला, असा टोला आमदार वारिस पठाण यांनी लगावला होता. यावर नितेश राणेंनी पठाण यांचे आव्हान स्वीकारत बशीर खान या तरूणाचे नाव जाहीर केले आहे.
पुढे वाचा, नितेश राणेंनी नेमके काय केले आहे टि्वट...