आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पनवेलचे काँग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर भाजपात, गडकरींच्या उपस्थितीत केला प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पनवेलमधील काँग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे चिरंजीव असलेले प्रशांत काँग्रेसने खारघर टोलनाक्याचा प्रश्न न सोडविल्याने काँग्रेस व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाराज होते. मागील आठवड्यात प्रशांत ठाकूर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे पाठविला होता.

पनवेल-सायन महामार्गावर खारघर येथे उभारलेला टोलनाका रद्द करा किंवा स्थानिक वाहनांना सवलत द्यावी अशी मागणी स्थानिक आमदार म्हणून प्रशांत ठाकूर यांनी केली होती. मात्र, त्याकडे आघाडी सरकारने दुर्लक्ष केले. दोन महिन्यापूर्वी ठाकूर यांनी रास्ता रोको करीत आंदोलन केले होते. वाशी येथे जवळच टोलनाका असताना खारघर येथे आणखी एक टोलनाका नको, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर पनवेल-सायन महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. झालेला खर्च खारघर येथे टोलनाका उभारून वसूल करण्याचे धोरण सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतले आहे.

आघाडी सरकार हा प्रश्न सोडवू शकत नसल्याचे कारण देत आमदारकीचा राजीनामा दिला व काँग्रेसकडून पुन्हा कधीही निवडणूक लढविणार नसल्याचे ठाकूर यांनी म्हटले होते. त्यानंतर प्रशांत ठाकूर व त्यांचे वडील रामशेठ ठाकूर यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली होती. अखेर आज गडकरींच्या उपस्थितीत ठाकूर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाच.