आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस आमदारांचा तक्रारींचा पाढा, मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर टीका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सत्ताधारी असूनही आमचीच कामे होत नसल्याने पुन्हा निवडून येणे मुश्कील असल्याची ओरड मंगळवारी विधानभवनात झालेल्या बैठकीत कॉँग्रेस आमदारांनी केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सर्वांच्या रडावर होते. आमदार यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, दिलीप सानंदा, अमर राजूरकर, अमीन पटेल अशा अनेकांनी तक्रारींचा पाढा वाचला. मुख्यमंत्र्यांनी वेळीच काही न केल्यास काँग्रेसचे पुन्हा सत्तेत येणे मुश्कील असल्याचा इशाराही त्यांनी दिला. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेही उपस्थित होते. आमदारांची प्रचंड नाराजी लक्षात घेऊन शेवटी मुख्यमंत्र्यांनी रोज दहा आमदारांना भेटून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.

कामासंबंधी आठ पत्रे मुख्यमंत्र्यांना देऊनही कामे होत नसतील तर काय करायचे? आमदार त्यांच्या कामामुळेच निवडून येतात. मंत्र्यांप्रमाणे निवडणुकीसाठी आठ-दहा कोटी रुपये खर्च करणे शक्य नाही, असे सांगत विदर्भातील आमदार यशोमती ठाकूर यांना भरून आले. 'राष्ट्रवादीची 288 जागांची तयारी झाल्याचे आमदार सानंदा म्हणाले. लोकसभेला काँग्रेस सरकार आले नाही तर ते विधानसभेला आपल्याबरोबर राहणार नाहीत. तुमचे धोरण सांगा', असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले.

विधी विद्यापीठ मुंबईला नेणार?- अमर राजूरकर म्हणाले, 'अजित पवारच जिल्ह्यातील सर्व बैठका कशा घेतात, पालकमंत्र्यांनाही विचारत नाहीत. मुख्यमंत्री आपला आहे असा संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे. नगरविकास खाते आपल्याकडे असूनही काँग्रेसच्या पालिकेला 25 लाख, तर राष्ट्रवादीच्या पालिकांना 75 लाख रुपये कसे दिले गेले? विधी विद्यापीठ औरंगाबादमध्येच होणार हे ठरले होते. विदर्भ-मराठवाड्यातून 60-70 आमदार येतात. मग ते मुंबईला का नेणार ? असा सवाल त्यांनी केला.