आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री आणि \'षंढ\' आमदार (ब्लॉग)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(8 मार्च, 2017 विधिमंडळ अधिवेशनातून, मुंबई.)
भाजपला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी झालेली शिवसेना दिवसाआड डरकाळ्या फोडताना दिसते. राजीनामे खिशात असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांना धाकात ठेवण्याचाही प्रयत्न आपण होतोय. आघाडी-युती सरकारच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची नेहमीच डगमगती असते यात नवीन काही नाही. परंतु, ज्या पक्षाचा मुख्यमंत्री त्याच पक्षाच्या आमदारांनी आपल्याच मुख्यमंत्र्यांविरोधात चक्क हक्कभंग आणल्याची बहुधा देशातील एकमेव, अभूतपूर्व घटना महाराष्ट्राच्या राजकारणात घडून गेलीय.
 
या प्रसंग ज्यांच्यावर बेतला ते मुख्यमंत्री होते काँग्रेसचे बाबासाहेब भोसले. बॅरिस्टर अंतुले यांच्या गच्छन्तिनंतर भोसलेंना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली. हे भोसलेसुद्धा बॅरिस्टर. पण त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कधीच मोजुनमापून बोलत नसत. जे मनात ते यांच्या ओठात. पक्षश्रेष्ठी इंदिरा गांधी यांच्यामुळं बाबासाहेब ध्यानीमनी नसताना अचानक मुख्यमंत्री झाले. हे औटघटकेचं पद आलं तसं गेलंही. पण त्यांचं जराही दुःख त्यांना नव्हतं. त्यांची प्रतिक्रिया होती, "माझं मुख्यमंत्रीपद काढून घेतलं. पण माझ्या नावामागं ‘माजी मुख्यमंत्री’ हे बिरुद कायमचं लागलंय. ते कोण काढू शकतो?" बाबासाहेबांचे असे किस्से चिक्कार आहेत. हाच फटकळपणा त्यांना नडला.
 
'वरुन लादलेले' मुख्यमंत्री म्हणून बाबासाहेबांबद्दल काँग्रेस आमदारांमध्ये खूप नाराजी होती. हे कॉंग्रेसचे नाराज आमदार भोसले यांच्याविरोधात बंड करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. स्वाभाविकपणे पत्रकारांनी या संदर्भात बाबासाहेबांना प्रश्न केला. तेव्हा बाबासाहेब म्हणाले,"आमच्या आमदारांची भाषा बंडाची, वृत्ती गुंडाची आणि कृती षंढाची असते." हे बोलून झाल्यानंतर बाबासाहेबांनी जीभ चावली खरी पण तोवर उशीर झाला होता.
 
मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्याच आमदारांचं केलेलं हे "व्यक्तीपरीक्षण" सर्वसामान्यांसाठी कमलीचं मजेदार आणि काँग्रेस आमदारांसाठी संतापजनक ठरलं. 'षंढ' असल्याचा बाबासाहेबांनी लावलेला शोध काँग्रेस आमदारांसाठी जास्त दुखावणारा ठरला. आमदार नानाभाऊ एंबडवार यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग दाखल केला. कॉंग्रेसच्या आमदारांनी बाबासाहेबांचा राजीनामा मागितला. यातून निर्माण झालेला पेचप्रसंग अभुतपूर्व होता. 'हायकमांड'च्या हस्तक्षेपानंतर काँग्रेस आमदारांनी उठवलेलं वादळ अखेरीस पेल्यातलंच ठरलं.
 
पुढील स्लाईडवर वाचा....हे अधिवेशन संपेपर्यंत तरी परिचारकांचं निलंबन नक्की. विधानपरिषदेतलं उद्याचं कामकाजसुद्धा चालणार नाही हेसुद्धा नक्की...
बातम्या आणखी आहेत...