आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने 2009 मध्ये निवडून आलेल्या 17 पैकी 4 खासदारांचा पत्ता कापण्याचे संकेत दिले आहेत. यात भिवंडी, पुणे, लातूर व दक्षिण मध्य मुंबईचा समावेश आहे. भिवंडीतून सुरेश टावरेंऐवजी विधान परिषदेचे आमदार मुझफ्फर हुसेन, पुण्यात सुरेश कलमाडींना वगळून आमदार मोहन जोशी, लातूरमधून जयंत आवळेंऐवजी अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव, तर दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड यांचे तिकीट कापून अर्थतज्ज्ञ भालचंद्र मुणगेकर यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाल्याचे कळते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिल्लीत पक्षo्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
हिंगोली, रायगडच्या जागेची अदलाबदल
चार जागांची अदलाबदल होण्याची चर्चा आहे. रायगडची जागा राष्ट्रवादीला, तर हिंगोलीची जागा काँग्रेससाठी सोडली जाईल. रायगडमध्ये राष्ट्रवादीचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, तर हिंगोलीत काँग्रेसचे राजीव सातव यांना उमेदवारी मिळेल. कोल्हापूर राष्ट्रवादीला हवे आहे, पण काँग्रेस सदाशिवराव मंडलिक यांना उमदेवारी देण्यासाठी उत्सुक आहे. हातकणंगलेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींविरुद्ध लढण्यास राष्ट्रवादी तयार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.