आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपी गेलेल्या अनिल अंबानींच्या घरासमोर आत्मदहन करणार - खासदार संजय निरुपम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील वीजदर कमी करण्याच्या मागणीसाठी उपोषण करणारे काँग्रेसचे नेते आणि खासदार संजय निरुपम यांचे आंदोलन तिस-या दिवशीही सुरु आहे. आज त्यांनी, रिलायन्सने दखल घेतली नाही तर, आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
मुंबईतील वीज कंपन्यांच्या ऑडिटच्या मागणीसाठी खासदार संजय निरुपम यांचे उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. त्यांचा सर्वाधिक आक्षेप रिलायन्स वीज कंपनीवर आहे. रिलायन्सचे वीजदर सर्वाधिक असल्याचा त्यांचा आरोप आहे. दर निम्म्याने कमी झाले नाही तर, रिलायन्सविरोधात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा खासदार निरुपम यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत दिला आहे.

खासदार निरुपमा म्हणाले, 'अंबानी यांना लाज असेल तर त्यांनी उपोषणाकडे लक्ष्य द्यावे,' अन्यथा रिलायन्सविरोधात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

भाजपवर टीकास्त्र
वीजदराच्या मुद्यावर उपोषणाला बसण्याआधी खासदार निरुपम यांनी दरवाढीसाठी भाजपला जबाबदार ठरविले होते. त्यांचा आरोप आहे, की 2002-2003 साली केंद्रात भाजपचे सरकार असतानाच त्यांनी वीज पुरवठा करण्याबाबत खासगीकरणाचे विधेयक आणले होते. त्याकाळी त्यांनी रिलायन्सची दलाली केली होती त्यामुळेच आज खासगी कंपन्यांचा या क्षेत्रात शिरकाव झाला आहे. याचबळावर ते हवी तेवढी वीज दरवाढ करीत आहेत व सामान्य ग्राहकांची लुट करून पिळवणूक करीत आहे.

अण्णा हजारेंनी ठेका घेतला नाही
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी सरकारने सत्तेवर येताच दोन दिवसातच वीज दर 50 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, मुंबईतही अशा प्रकारची मागणी करणारे पत्र संजय निरूपम यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिले होते. तसेच केजरीवाल सरकार हे करू शकते तर महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. जर वीज दरवाढ कमी केली नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, त्यांचा इशारा रिलायन्स आणि राज्य सरकार दोघांनीही गांभीर्याने घेतला नाही. त्यानंतर तीन दिवसांपासून खासदार निरुपम यांचे उपोषण सुरु आहे.
उपोषणाला सुरवात करण्याआधी, समाजाच्या भल्यासाठी केवळ अण्णा हजारे यांनीच आंदोलन करण्याचा ठेका घेतला नाही आम्ही आंदोलन करू शकतो असे ते म्हणाले होते.