आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress MP Sanjay Nirupam Ends His Indefinite Hunger Strike

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर खासदार संजय निरूपम यांचे आंदोलन मागे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेली चार दिवस मुंबईतील वीजदर कमी करावेत या मागणीसाठी उपोषणास बसलेले काँग्रेसचे खासदार संजय निरूपम यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वीज दर कमी करण्याबाबत संकेत दिले तसेच रिलायन्ससह खासगी वीज कंपन्यांचे ऑडिट करण्याची मागणी मान्य केली. त्यानंतर निरूपम यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या हातून ज्यूस पीत उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. यावेळी खासदार प्रिया दत्त, हुसेन दलवाई यांच्यासह मुंबईतील काँग्रेस नेते उपस्थित होते.
संजय निरूपम यांनी आपल्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले तर रिलायन्स एनर्जीचे मालक अनिल अंबानी यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याची धमकी दिल होती. जर सरकारने व रिलायन्सने माझ्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सगळ्यादेखत आपण आग लावून घेऊ.
संजय निरूपम मुंबईतील कांदिवलीस्थित रिलायन्स एनर्जी कंपनीच्या कार्यालयाबाहेर गेल्या चार दिवसापासून उपोषणास बसले होते. तसेच रिलायन्ससह खासगी वीज कंपन्याचे ऑडिट करण्याची मुख्य मागणी होती. निरूपम यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मुंबई उपनगरचे पालकमंत्री नसीम खान, जनार्दन चांदूरकर, कृपाशंकर सिंग आदी नेते उपस्थित होते. मात्र गेल्या पाच-सहा दिवस मुख्यमंत्री दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. शनिवारी विमानतळावर पोहचताच निरूपम यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री चव्हाण यांना घेराव घातला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मी आताच मुंबईत आलो आहे 24 तासात याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते.
मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळत काल 26 जानेवारीची सुट्टी असतानाही प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी मंत्रालयात वीजदराबाबत बैठक लावली. यात मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासह प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार एकनाथ गाडकवाड, प्रिया दत्त यांच्यासह अनेक काँग्रेस नेते सामील झाले होते. त्यानंतर वीज दर कमी करण्याबाबत व खासगी कंपन्यांचे ऑडिट करण्याची निरूपम यांची मागणी मान्य करण्याचे ठरले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन माणिकराव ठाकरे निरूपम यांच्याकडे उपोषणस्थळी गेले व तुमच्या मागण्या मान्य झाल्याचे सांगितले. त्यानंतर ठाकरे यांच्या हस्तेच ज्यूस पिऊन निरूपम यांनी उपोषण संपवित असल्याचे जाहीर केले.