आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Nationalist News In Marathi, Divya Marathi, Assembly Election

राष्ट्रवादीचा काँग्रेसला इशारा; अपेक्षित जागा द्या, अन्यथा पर्याय खुले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधानसभा निवडणुकांत काँग्रेससोबत आघाडी करून लढण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. मात्र जागावाटपात काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर वेगळा विचार करू, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिला. त्या दृष्टीने २८८ मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू असून सोमवारपासून इच्छुकांच्या मुलाखती होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीनंतरची बदलती स्थिती पाहून विधानसभेचे जागावाटप व्हावे.
राष्ट्रवादीला विधानसभेच्या निम्म्या म्हणजे १४४ जागा िमळाव्यात. तसेच काही जागांची अदलाबदल व्हावी, अशी भूमिका बैठकीत आम्ही मांडली. काँग्रेसकडून कसा प्रतिसाद मिळतो, त्याची प्रतीक्षा आहे, असे पटेल पत्रकारांजवळ म्हणाले. काँग्रेस मागे फरफटत न जाता स्वतंत्र लढावे असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. मात्र धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये असा आमचा प्रयत्न असल्याचे पटेल म्हणाले.