आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congress Nationalist News In Marathi, Maharashtra Assembly Election 2014, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता घड्याळाचा टाइमबॉम्ब, राष्ट्रवादीचा काँग्रेसला एक दिवसाचा अल्टिमेटम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागावाटपाच्या मुद्द्यावरून महायुतीप्रमाणेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बिघाडीचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसने दिलेला १२४ जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने धुडकावला असून एक दिवसात काय तो निर्णय घ्या, असा अल्टिमेटमच काँग्रेसला दिला आहे.
राष्ट्रवादीची वाढलेली ताकद पाहता आम्हाला निम्म्या १४८ जागा हव्या आहेत. रविवारपर्यंत मागणी मान्य न झाल्यास सोमवारी अजित पवार, सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांना भेटून अंतिम भूमिका स्पष्ट करतील आणि आघाडीचा अंतिम निर्णय घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.

आघाडी व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. पण ती कायम ठेवायची असेल तर मित्रपक्षाचाही सन्मान करायला हवा. आता वेळ कमी राहिला असून काँग्रेसने दोन पावले पुढे टाकून आघाडीचा धर्म पाळावा. निर्णय झाल्यास काही जागांवर अदलाबदल होऊ शकते, असे पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

एक दिवस वाट पाहू
‘उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. आमच्या प्रस्तावावरील प्रतिसादासाठी आम्ही आता एक दिवस काँग्रेसची वाट पाहू शकतो.
प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते.

आघाडी धोक्यात
काँग्रेसच्या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. १४४ जागांच्या मागणीवर राष्ट्रवादी ठाम राहिली तर आम्हाला एकट्याने लढावे लागेल.
माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

उमेदवार यादीची तयारी सुरू : जागावाटपाची वाट न पाहता काँग्रेस निवडणूक समितीने शनिवारी गेल्यावेळी लढलेल्या १७४ जागांवर उमेदवार निश्चित करण्याचे काम हाती घेतले आहे.

काँग्रेसचा प्रस्ताव
काँग्रेसने राष्ट्रवादीकडे १२४ जागांचा प्रस्ताव दिला आहे. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने लढलेल्या जागांपेक्षा १० जागा जास्त आहेत.

हा जुनाच फॉर्म्युला
२००४ मध्ये १२४ जागांवर लढलो. लोकसभेला आम्ही जास्त जागा जिंकल्याने जुना फॉर्म्युला चालणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे.