मुंबई - मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजप या मित्रपक्षांत तणाव निर्माण झालेला असताना काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचे घोडेही रविवारपर्यंत अडलेलेच होते. दिल्लीत शनिवारी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादीची १४४ जागांची मागणी काँग्रेसने फेटाळून केवळ १२८ जागा देण्याचीच तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आघाडीतही पुन्हा जागावाटपाच्या मुद्द्यावर तिढा निर्माण झाला आहे.
शनिवारी काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात झालेल्या अनौपचारिक चर्चेत राष्ट्रवादीची १४४ जागांची मागणी काँग्रेसने फेटाळल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र १२८ जागा देण्याची तयारी दाखवली असल्याचेही कळते आहे. त्याला राष्ट्रवादी कसा प्रतिसाद देणार यावर जागावाटपाचा तिढा केव्हा सुटेल हे अवलंबून आहे. शरद पवार काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत आग्रही असल्याने १४४ जागांचा हट्ट सोडून राष्ट्रवादी काँग्रेसही १२८ ते १३० जागांवर तडजोड करेल अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय ितढा सुटला तरी जागा वाटपाची अिधकृत घाेषणा िपतृपक्षानंतरच केली जाईल, असेही सांिगतले जात आहे.
वरिष्ठांचा निर्णय मान्य
‘आघाडीबाबतची चर्चा वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर सुरू आहे. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामतीत सांगितले. ‘१४४ जागा द्या अन्यथा स्वबळावर लढू’ अशी आक्रमक भूमिका घेणाऱ्या अजित पवारांनी आता तडजोडीची भूिमका घेतल्यामुळे राष्ट्रवादीने दबावतंत्र आता कमी केले असल्याचे िनष्कर्ष राजकीय वर्तुळातून काढले जात आहेत.