आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नारायण राणे मैदानात असो अथवा नसो काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार देणारच- अशोक चव्हाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपला संयुक्त उमेदवार उभे करणार आहेत. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, राणेंनी निवडणूक लढवली किंवा नाही लढवली तरी आम्ही आमचा उमेदवार उभा करणार आहोत. येत्या 7 डिसेंबर रोजी या जागेसाठी निवडणुक होणार आहे. काँग्रेस सोडल्यामुळे राणेंना या जागेचा राजीनामा द्यावा लागला होता. या जागेसाठी राणे हे भाजप पुरस्कृत उमेदवार असु शकतात. राणेंनी ही निवडणूक न ठरविल्यास अन्य कोणाचातरी भाजप या जागेसाठी विचार करु शकते. या जागेसाठी 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. चव्हाण म्हणाले की, तत्पूर्वी आम्ही एकमताने उमेदवार ठरवू.

 

शिवसेनेच्या मदतीची पडणार गरज
- विधान परिषदेच्या या जागेवर विजय मिळविण्यासाठी 145 आमदारांच्या समर्थनाची गरज आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे 81 आमदार आहेत. शिवसेनेच्या समर्थनाशिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकू शकत नाही.

- शिवसेनेकडे 63 आमदार आहेत. यापैकी शिवसेनेचे एक आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे भाजपसोबत आहेत. त्यामुळे आता शिवसेनेचे संख्याबळ 62 झाले आहे. सुत्रांनूसार या निवडणुकीत आमदारांच्या खरेदीबाबत इन्कार करता येऊ शकत नाही. त्यामुळेच काँग्रेस धनवान उमेदवाराच्या शोधात आहे. घोडेबाजार झाल्यास हा उमेदवार मतांचा बंदोबस्त करु शकतो. 

 

अहमदाबादमध्ये काय घडले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबाद येथे जाऊन भाजप अध्यक्ष अमित शाह यांची याबाबत भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे सुध्दा होते. यावेळी मंत्रीमंडळ विस्तार, विधानपरिषदेची निवडणुक यावर चर्चा करण्यात आली. याबाबत अंतिम निर्णय 28 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर घेण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण गुजरात निवडणूकीबाबत ही बैठक घेतल्याचे सांगितले. 

 

राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
तत्पूर्वी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीबाबत त्यांच्याशी चर्चा केली. मात्र राणेंनी याबाबत माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. राणे म्हणाले की, आपण पत्रकार परिषद घेऊन विधानपरिषद पोटनिवडणुकीबाबत बोलू. 

 

मुख्यमंत्र्यांनी अमित शाहांसोबत झालेली बैठक ही गुजरात निवडणुकीबाबत असल्याचे सांगितले. अमित शाह हे अनेक दिवसांपासून अहमदाबादमध्ये आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात ही मुलाखत विधानपरिषद पोटनिवडणूकीसंदर्भात व मंत्रीमंडळ विस्ताराबाबत असल्याची चर्चा रंगली आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...