आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress ncp Seat Sharing Conflicts Still Going On

फक्त आमच्या जागांवरच मुलाखती, काँग्रेसच्या इशा-यानंतर राष्ट्रवादी बॅकफूटवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच्या सर्व 288 मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेत काँग्रेसवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केल्याने काँग्रेसने निर्वाणीचा इशारा देताच राष्ट्रवादी बॅकफूटवर आली आहे. राष्ट्रवादीला आघाडी करायची असेल तरच पुढची बोलणी होतील असे काँग्रेसने जाहीर केल्यानंतर, राष्ट्रवादीने आम्ही फक्त आमच्या जागांवर मुलाखती घेतल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच इतर मतदारसंघातील इच्छुकांची चाचपणी केल्याचे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील जागावाटपावरून गेली दोन महिने रामायण घडत आहे. काँग्रेस जुन्याचा फॉर्म्यूल्यावर ठाम असले तरी राष्ट्रवादी 144 जागा हव्या असल्याचे बोलत आहे. मात्र, काँग्रेसने 120 जागांपेक्षा एकही जागा वाढवून देणार नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीने दिलेल्या प्रस्तावावर काँग्रेसने कोणताही प्रतिसाद न दिल्याचे पाहून सर्वच्या सर्व 288 जागांवर मुलाखती घेऊन काँग्रेसवर दबाव वाढविण्याचा राष्ट्रवादीने प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसने हाणून पाडत आघाडी करायची असेल तरच पुढील बोलणी होईल अशी भूमिका घेतली. याचबरोबर राष्ट्रवादी सर्व जागांवर मुलाखती घेत असल्याचे सांगून दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे सर्व जागांवर मुलाखती घेण्याची परवानगी मिळावी असे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी साकडे घातले.
या घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसेच आघाडीबाबत चर्चा केल्याचे समजते. याचबरोबर आमच्या जागांवर व ज्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या ताकद वाढली आहे त्या मोजक्याच ठिकाणावरील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याचे स्पष्टीकरण दिले. याचबरोबर आघाडी करण्याचा निर्णय कायम असल्याचे सांगत माघार घेणे पसंत केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदारांच्या पण काँग्रेसच्या मतदारसंघांवर दावा केला आहे. राष्ट्रवादीला 9 अपक्षांचा पाठिंबा आहे.